Maruti Omni car caught fire esakal
नाशिक

Nashik Fire Accident: धावत्या चारचाकीने घेतला पेट; भोळे कुटुंबीय थोडक्यात बचावले

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : सारडा सर्कल येथे मंगळवार (ता. २१) सकाळी अकराच्या सुमारास धावत्या मारुती ओमनी चारचाकीने अचानक पेट घेतला.

चालकाच्या प्रसंगाधवनाने भोळे कुटुंबीय थोडक्यात बचावले. आगीत वाहन जळून खाक झाले. घटनेमुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. (Nashik Fire Accident running four wheeler caught fire gullible family narrowly escaped)

पिंपळगाव बसवंत येथील गणेश भोळे पत्नी सोनाली आणि त्यांचा चार महिन्याचा मुलगा, असे तिघे (एमएच- १८- डब्ल्यू- ३७१८) चारचाकीतून सारडा सर्कल परिसरातून घरी परतत होते.

मागील बाजूने धूर येत असल्याचे नागरिकांनी त्यांना सांगितले. जागेवरच चारचाकी थांबवून तिघांनी वाहनांपासून दूर पळ काढला. काही क्षणातच आगीचा भडका उडाला. संपूर्ण चारचाकी जळून राख झाली.

रस्त्यावरून धावत्या अन्य वाहनांनी जागेवरच वाहने थांबून ठेवल्याने लांबच लांब वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान समीर शेख यांनी अग्निशामक विभागास घटनेची माहिती दिली. वाहतूक कोंडीमुळे अग्निशामक बंबास घटनास्थळी पोचण्यास अडचण निर्माण झाली.

अग्निशामक कर्मचाऱ्यांनी बंबातून खाली उतरत वाहतूक कोंडी सोडवली. त्यानंतर बंब घटनास्थळी दाखल होऊ शकला. आगीवर पाण्याचा मारा करत अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात नियंत्रण मिळवण्यात आले.

भोळे कुटुंबीय जिल्हा रुग्णालयात त्यांच्या चार महिन्याच्या मुलास डोस देण्यासाठी आले होते. डोस देऊन घरी परतत असताना घटना घडली. बॅटरीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली.

आग लागताच कारची विक्री

सारडा सर्कल येथे लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या चारचाकीच्या आगीवर अग्निशामक विभागाकडून नियंत्रण मिळवताच. त्या चारचाकीची अवघ्या काही वेळेतच सारडा सर्कल भागातीलच भंगार व्यावसायिकास विक्री करण्यात आली.

या घटनेने परिसरातील नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. चारचाकी विक्री करण्याची घाई का करण्यात आली असावी, असे प्रश्न उपस्थित झाले. विशेष म्हणजे पोलिस ठाण्यातदेखील घटनेची नोंद करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांचा आणखी संशय बळावत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Sonawane : पुस्तकी ज्ञानापलीकडची शाळा! अशोक सोनवणे गुरुजींनी घडविले ३००० हून अधिक बालकलाकार

Satara News: पत्नीच्या डिलिव्हरीसाठी येताच काळाचा घाला, ८ तासांची चिमुकली पित्याच्या अंत्यदर्शनासाठी | Sakal News

Pune News: इमारतीवरून तोल गेल्याने मुलाचा मृत्यू; पतंग उडविताना कात्रजमध्ये घटना, बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा!

Solapur University: शॉकिंग अपडेट! पुण्यश्लोक होळकर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना उच्च रक्तदाब; संशोधनातील आकडे पाहून थक्क व्हाल

Crime News : नोटाबंदीनंतरही ४०० कोटींच्या जुन्या नोटा? घोटी पोलीस तपासात धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT