Nashik District Bank esakal
नाशिक

Nashik News : सरकारी, परिषद कर्मचारी बँकेस 2 कोटींवर नफा; गेल्या 17 वर्षातील उच्चांक

Nashik : नाशिक येथील जिल्हा परिषद व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेस २०२३-२४ या आर्थिक वर्षात पाच कोटी १२ लाख ३६ हजार रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक येथील जिल्हा परिषद व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेस २०२३-२४ या आर्थिक वर्षात पाच कोटी १२ लाख ३६ हजार रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे. सर्व तरतुदी व आयकर वजा जाता निव्वळ नफा दोन कोटी १५ लाख १ हजार रुपये इतका झाला आहे. गेल्या १७ वर्षांतील बँकेचा हा सर्वाधिक निव्वळ नफा असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे-पाटील, उपाध्यक्ष महेश मुळे यांनी दिली. (Nashik Government and Parishad Employees Bank profit over 2 crore marathi News )

३१ मार्चअखेर बँकेची सभासद संख्या १५ हजार ६६१ इतकी असून, भाग भांडवल २२ कोटी २४ लाख, राखीव व इतर निधी २७ कोटी ५ लाख, एकूण ठेवी ३४८ कोटी ५५ लाख, कर्जवाटप २५२ कोटी ६४ लाख, गुंतवणूक १२३ कोटी ९५ लाख, एकूण व्यवसाय ६०१ कोटी १९ लाख, खेळते भांडवल ४०१ कोटी ६५ लाख,

सी.आर.ए.आर. १४ टक्के इतका असून, बँकेचा निव्वळ नफा दोन कोटी १५ लाख १ हजार रुपयेइतका झाला आहे. मागील वर्षापेक्षा ठेवीत १३ कोटी ८५ लाख, कर्ज वाटपात २३ कोटी ४० लाख, तर निव्वळ नफ्यात ४८.७० लाखांनी वाढ झाली आहे. बँकेचा ढोबळ एनपीए ३.५४ टक्केइतका असून, निव्वळ एनपीए १.७७ टक्के आहे. (latest marathi news)

बँकेच्या सर्व खातेदारांनी ५२५ दिवसांच्या ठेवीसाठी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे-पाटील, उपाध्यक्ष महेश मुळे, संचालक प्रमोद निरगुडे, नीलेश देशमुख, अजित आव्हाड, रवींद्र आंधळे, मंदाकिनी पवार, सुनील गिते, धनश्री कापडणीस, रवींद्र बाविस्कर, मोहन गांगुर्डे, ज्ञानेश्वर माळोदे, जयंत शिंदे, विजय देवरे, रमेश बोडके, अभिजित घोडेराव, सचिन विंचुरकर, विक्रम पिंगळे, अमोल बागूल, विनोद जवागे, भरत राठोड यांनी सर्व ठेवीदारांचे आभार मानले.

बँकेने केलेल्या नेत्रदीपक कामगिरीमुळे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ मार्गदर्शक दिलीप थेटे, माजी उपाध्यक्ष उत्तम (बाबा) गांगुर्डे, माजी अध्यक्ष रवींद्र थेटे, संदीप पाटील, माजी संचालक दिलीप सलादे, बबनराव भोसले, रमण मोरे यांनी बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, अधिकारी कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले आहे.

''बँकेने कर्जवाटप करताना कडक धोरण अवलंबविले. नियमात बसत असेल तेवढेच कर्ज मंजूर केले. त्यामुळे नजीकच्या काळात एनपीए व थकबाकीचे प्रमाण नक्कीच कमी होऊन चांगल्या दराने लाभांश देता येणार आहे. सभासदांसाठी नियमित कर्ज २० लाख, चारचाकी वाहन कर्ज २५ लाख, शैक्षणिक कर्जाची मर्यादा ५ लाखांवरून १५ लाख, गृह कर्जमर्यादा ५० लाख इतकी ठेवणात आलेली असून, त्यास उत्तम प्रतिसाद मिळत आहे.''- बाळासाहेब ठाकरे- पाटील, अध्यक्ष, नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Special Envoy Sergio Gor: ट्रम्प यांचे विशेष दूत सर्जियो गोर यांचं मोठं विधान म्हणाले, ''भारत आमचा धोरणात्मक भागीदार अन्... ''

IND vs WI Test Series: केएल राहुलकडे कसोटी संघाचे नेतृत्व, श्रेयस अय्यरचे पुनरागमन; वेस्ट इंडिजविरुद्ध अशी असेल टीम इंडिया

Modem Balakrishna : कोण होता मॉडेम बालकृष्ण? तब्बल एक कोटींचा होता इनाम, खात्मा झाल्याने नक्षलवाद्यांना मोठा झटका

Pune News : तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला मरेपर्यंत जन्मठेप

Nepal Protests : नेपाळमधील आंदोलनानंतर विमानसेवा सुरू, पर्यटकांचा मायदेशी परतीचा प्रवास

SCROLL FOR NEXT