State president of NCP Jayant Patil while guiding the gathering of workers of Mahavikas Aghadi. esakal
नाशिक

Nashik Jayant Patil : मविआला अंदाजे 30 ते 35 जागा मिळणार : जयंत पाटील

Nashik News : राज्यात ३० ते ३५ जागा महाविकास आघाडीला मिळतील असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (शरद पवार पक्ष) जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : भाजपाच्या विरोधात ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हातात घेतली आहे. जनतेच्या मनात प्रचंड रोष असल्याने सर्वत्र महाविकास आघाडीला उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून नाशिकच्या दोन्ही जागांसह राज्यात ३० ते ३५ जागा महाविकास आघाडीला मिळतील असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (शरद पवार पक्ष) जयंत पाटील यांनी व्यक्त केला.(Jayant Patil statement Mavia will get approximately 30 to 35 seats)

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारासाठी येथे महाविकास आघाडीचा बूथ प्रमुख व कार्यकर्ता मेळावा बुधवारी (ता.१५) झाला. यावेळी श्री. पाटील बोलत होते. माजी आमदार मारोतराव पवार, आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार कल्याणराव पाटील.

पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ॲड. माणिकराव शिंदे, माजी जि.प. सदस्य संजय बनकर, शिवसेना जिल्हाप्रमुख कुणाल दराडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शाहू शिंदे उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले, की देशात महाविकास आघाडीला पोषक वातावरण आहे.

विजय नक्की होणार असून जनता यावेळी आपल्या सोबत आहे. प्रत्येकाने महाविकास आघाडीचे धोरण व सर्व समावेशक जाहीरनामा लोकांपर्यंत पोचवा असे आवाहन श्री पाटील यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, गोकुळ पिंगळे, श्याम हिरे, तिलोतमा पाटील, संजय कासार, छगन आहेर,भास्कर कोंढरे, मनोज रंधे. (latest marathi news)

प्रवीण गायकवाड, कांतिलाल साळवे, दिलीप मेंगाळ, झुंजार देशमुख, रतन बोरणारे, वाल्मीक गोरे, प्रीतम पटणी, बाळासाहेब मांजरे, मंगल परदेशी, निवृत्ती लहरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन शहराध्यक्ष योगेश सोनवणे यांनी केले. या प्रसंगी योगेश सोनवणे, विठ्ठल शेलार, सुभाष निकम, काका वाणी, अकबर शहा, माजीद अन्सारी, निसारभाई निंबुवाले, राजेश कदम, सुरेश कदम,नारायण मोरे, दीपक लाठे, अनिल शिंदे, संकेत सोनवणे, अन्सार शेख, अमित शिंदे, सुमीत बगदाणे, पंकज सदगीर, अक्षय तांदळे आदी उपस्थित होते.

‘मविआ’ला संधी देण्याचे आवाहन

यावेळी मेहबूब शेख, श्री. पवार, ॲड. शिंदे, श्री. पाटील, डॉ. तांबे, श्री. बनकर, श्री. दराडे, , महेंद्र पगारे, अजिज शेख, समीर देशमुख, श्री. पडवळ यांनीही ‘मविआ’ला संधी द्यावी असे आवाहन केले.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचा खर्च दुप्पटीवर : पाटील

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी भरडला जात असून कांद्याच्या निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. सत्तेत येताना शेतकऱ्यांना उत्पन्न दुप्पट करण्याचे सांगितले गेले पण आज खते महाग झाले, खर्च वाढला,शेतीशी संबधित घटकावर जीएसटी लावला गेल्याने उत्पन्न नव्हे तर शेतीचा खर्च दुप्पट झाला आहे.

शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. पाटील यांनी आपली भूमिका मांडली. सगळ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकाच्या धोरणामुळे प्रचंड तोटा मागच्या सहा महिन्यापासून सहन कारवार लागला आहे.

पंतप्रधान मोदी काहीतरी आश्वासन देतील पण आता बोलून काही उपयोग नाही. कांदा निर्यातबंदीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना आज पंतप्रधानाच्या सभेच्या पार्श्वभूमीवर नजरकैदेत ठेवले असून ही हुकुमशाही आहे. राज्यातील जनता महागाई, बेकारी, गॅस, इंधन दरवाढ तसेच जीएसटीचा वाढलेला बोजा यामुळे त्रस्त झाली आहे.

निवडणुकीत महायुतीकडून प्रचंड प्रमाणात पैशाचा पाऊस पडत असून शेवटच्या दोन-तीन दिवसांत सर्व प्रकार केले जात आहे. निवडणूक आयोग व अधिकारी बघ्याची भूमिका घेत असून याबाबत आम्ही तक्रारी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT