Mango  esakal
नाशिक

Akshaya Tritiya 2024 : अक्षयतृतीयेनिमीत्त बाजार पेठ सजली! साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या मुहूर्त साधण्याची लगबग

Nashik News : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ गजबजली आहे. या दिवशी पितरांच्या नावाने घागर भरली जाते तसेच आंब्याचे महत्त्व असते.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ गजबजली आहे. या दिवशी पितरांच्या नावाने घागर भरली जाते तसेच आंब्याचे महत्त्व असते. त्यासाठी आंबे, घागर महिलांसह नागरिकांकडून खरेदी केले जात आहे. या मुहूर्तावर खरेदी करणे शुभ मानलं जात असल्याने घर खरेदी, वाहन खरेदी, सोने -चांदी खरेदी करण्याचा मुहूर्त नाशिककर साधत आहेत. शहरातील वाहन विक्री दालनात, सुवर्णबाजारात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. (Akshaya Tritiya)

आंबे खरेदीसाठी गर्दी

आंबे खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी झाली आहे. शहरातील विविध भागांत आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून नाशिककर कोकणातील हापूस आंब्यावर ताव मारत आहेत. यंदा आंब्याची आवक चांगली असल्याने दर कमी आहेत, अशी माहिती कोकण आंबा महोत्सवाचे आयोजक दत्ता भालेराव यांनी दिली.

रत्नागिरी, देवगड हापूस आंब्याला ३५० ते ९०० रुपये डझन भाव असून यासाठी नाशिककर मोठ्या प्रमाणावर आंबे खरेदीसाठी गर्दी करत आहेत. यासह बाजारात बदाम आंबा ७० ते १००, तर केशर आंबा ८० ते १२० रुपये किलो प्रमाणे विक्री होत आहे.

घागरीला मोठी मागणी

अक्षयतृतीयेला पूर्वजांचे घागर भरण्याची पंरपरा आहे. घागर विक्रीसाठी विक्रेत्यांनी गोदातीरावर तसेच शहरातील विविध परिसरात दुकाने थाटली आहेत. घागरीचे दर ७० पासून ते १५० रुपयांपर्यंत आहेत. पूजा-साहित्य, केळीचे पाने, गवरी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी बाजारात होत आहे. (latest marathi news)

वाहन खरेदीचा उत्साह

अक्षयतृतीया हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी आहे त्यामुळे यादिवशी कुठल्याही वस्तूची खरेदी करणं शुभ मानले जाते. त्यामुळे घर, वाहन, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी केली जात आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांचे नागरिकांनी बुकिंग केले असून अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर वाहन घरी नेणार आहेत. वाहन खरेदीसाठी इलेक्ट्रिक वाहनांना पसंती दिली जात आहे.

तसेच आपल्या बजेटनुसर सेकंड हँड गाड्यांना देखील मोठी मागणी आहे. अक्षयतृतीयेच्या निमित्ताने नवीन सह सेकंड हँड वाहन बाजारात देखील मोठ्या प्रमाणावर उलाढाल होईल अशी माहिती विक्रेत्यांनी दिली आहे.

इलेक्ट्रॉनिक बाजारात ग्राहकांची मांदियाळी

अक्षयतृतीयेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी टिव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, मायक्रोवेव्ह ओवन यांसारख्या गृहोपयोगी वस्तूंची खरेदी केली. तसेच वाढत्या उष्णतेपासून गारवा मिळावा यासाठी एसी, कूलरची देखील मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. विशेषतः तरुणांनी मोबाईल, लॅपटॉप, टॅब, स्मार्टवाच यांसारख्या इलेक्ट्रॉनिक गॅजेटची खरेदी केली.

विक्रेत्यांकडून ३० ते ५० टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काऊंट, यासह झिरो डाऊनपेमेंट वर कर्ज व हप्त्याची सोय तसेच क्रेडिट कार्ड, फायनान्स याद्वारे कॅशलेस खरेदीवर त्वरित कॅश बॅक या विविध स्कीममुळे ग्राहकांनी इलेक्ट्रॉनिक बाजारात ग्राहकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.

सोने- चांदी खरेदीकडे कल

अक्षयतृतीयेला सोन्या- चांदीची खरेदी- गुंतवणूक शुभ मानली जाते. ऐन लग्नसराईत पंचाहत्तर हजार प्रति तोळा पोचलेल्या सोनेदरात काहीशी घसरण झाली. बुधवारी (ता. ८) २४ कॅरेटसाठी ७२ हजार ३५० रुपये प्रतितोळा तर २२ कॅऱेटसाठी ६६ हजार रुपये इतका भाव होता. चांदी प्रतिकिलो ८२ हजार ६६६ रुपये असा दर होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

B Sudarshan Reddy reaction : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील पराभवानंतर बी. सुदर्शन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

SCROLL FOR NEXT