chhagan bhujbal Sakal
नाशिक

नाशिक महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचे संकेत - छगन भुजबळ

छगन भुजबळ ; सन्मानपूर्वक आघाडीसाठी प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिका निवडणुकीतही (Nashik Municipal Corporation election) राज्यातील महाविकास आघाडीचा(Mahavikas Aghadi) पॅटर्न राबविण्याचे संकेत पालकमंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून शिवसेना व काँग्रेस या महाविकास आघाडीतील पक्षांशी सन्मानपूर्वक आघाडी करण्याचा प्रयत्न करण्याचे सूतोवाच करतानाच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी तयारीला लागा असे आवाहन त्यांनी केले.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मंत्री भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी खासदार देविदास पिंगळे, प्रदेश पदाधिकारी नाना महाले, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, शहर उपाध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, विद्यार्थी शहराध्यक्ष अॅड. गौरव गोवर्धने, शहर सरचिटणीस संजय खैरनार, विधानसभा अध्यक्ष किशोर शिरसाट आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी श्री. भुजबळ म्हणाले, ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकार व महात्मा फुले समता परिषदेकडून न्यायालयात दावा दाखल केला असून निकाल लवकर अपेक्षित आहे. परंतु, निकालाची वाट न पाहता निवडणुकीच्या तयारी लागावे. राज्यात महाविकास आघाडी सरकारला संपूर्ण राज्यातील जनतेची पसंती असून, वरिष्ठ पातळीवर सन्मानजनक आघाडी करण्यासाठी प्रयत्न केले जातील. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संख्याबळ सध्या कमी असले तरी यंदाच्या निवडणुकीत अधिकाधिक नगरसेवक निवडून देत भरपाई करावी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद अधिक वाढविण्यासाठी काम करावे.

एकीकडे आघाडी, दुसरीकडे स्वबळ

महाविकास आघाडीचे संकेत देताना एकीकडे देत असतानाच दुसरीकडे भुजबळ यांनी सर्वच जागांवर लढण्याची तयारी करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केल्याने नेमके महाविकास आघाडी की स्वबळ, असा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे. इच्छुकांनी आपल्या वॉर्डात निवडणुकीच्या तयारीला लागावे. निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना बदलून त्या ठिकाणी सक्रिय सदस्याला जबाबदारी द्यावी. शहरातील सहा विभागात वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची नेमणूक करून जबाबदारीचे वाटप करावे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे. महापालिका निवडणुका स्वबळावर लढावी, अशी इच्छा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT