nashik municipal corporation in financial crisis due lockdown
nashik municipal corporation in financial crisis due lockdown 
नाशिक

कोरोनामुळे महापालिका आर्थिक संकटात; भांडवली कामांना आयुक्तांचा ‘ब्रेक’

विक्रांत मते

नाशिक : कोरोना प्रादुर्भावाला तोंड देत असतानाच महापालिकेसमोर एकीकडे साथीच्या आजारांना सामोरे जाण्याचे आव्हान, तर दुसरीकडे नव्याने आणखी एक आर्थिक संकट उभे राहिले आहे. चार महिन्यांत उत्पन्न घटल्याने नवीन भांडवली कामांच्या नस्ती सादर न करण्याच्या सूचना आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विभागप्रमुखांना दिल्याने विकासकामांना ‘ब्रेक’ लागणार आहे. 

महापालिकेने २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे २१६१.७९ कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. स्थायीने विविध योजनांचा समावेश करताना २२८.५५ कोटींची वाढ सुचविल्याने २३९०.३४ कोटींपर्यंत अंदाजपत्रक पोचले. स्थायीने महासभेला अंदाजपत्रक सादर केले. परंतु कोरोनामुळे महासभेच्या अंदाजपत्रकात फारशी वाढ झाली नाही. तब्बल तीन महिन्यांनंतर महापालिका प्रशासनाकडे अंतिम अंदाजपत्रक अंमलबजावणीसाठी हाती पडले. स्थायी समिती व महासभेने जमेच्या बाजूमध्ये वाढ केली असली तरी चार महिन्यांत अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. महापालिकेच्या उत्पन्नात शासनाकडून प्राप्त होणाऱ्या ‘जीएसटी’ अनुदानाचा मोठा वाटा असतो. मासिक सरासरी ८२ कोटी रुपये शासनाकडून मिळतात. परंतु शासनाची आर्थिक परिस्थिती ढासळल्याने जून व जुलैमध्ये जीएसटी अनुदान वेळेत मिळाले नाही.

‘जीएसटी’पाठोपाठ नगररचना विभागाकडून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. परंतु एप्रिल ते जुलै यादरम्यान ८० कोटी रुपये मिळणे अपेक्षित असताना अवघे वीस कोटी रुपये प्राप्त झाले. घरपट्टी व पाणीपट्टीत गेल्या वर्षाच्या तुलनेत १४.४६ कोटींची तूट निर्माण झाली. १ एप्रिल ते २८ जुलैदरम्यान घरपट्टीची ४०.४२ कोटींची वसुली झाली. कोरोनामुळे बंद राहिलेले उद्योगधंदे, बुडालेला रोजगार याचा थेट परिणाम महापालिकेच्या करवसुलीवर झाला. घरपट्टी सवलत योजनेत दोनदा मुदतवाढ देऊनही अपेक्षित वाढ झाली नाही. 

स्थायीच्या अंदाजपत्रकाचा फुगा फोडला 
महापालिकेच्या वित्त व लेखा विभागाने जुलै २०२० अखेर जमा व संभाव्य जमा होणाऱ्या महसुलाचा विभागनिहाय आढावा घेतला. त्यात जूनअखेर उत्पन्नाच्या जमेची बाजू पाहता विभागप्रमुखांनी मूळ अंदाजपत्रकाप्रमाणे जमा प्राप्त होईल, त्यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना आयुक्तांनी देऊन स्थायी समिती व महासभेने फुगविलेल्या अंदाजपत्रकाचा फुगा फोडला. जमा उत्पन्नाची सद्यःस्थिती, कामांचे दायित्व तसेच कोविड-१९ साढी वाढीव तरतुदी करण्याची गरज लक्षात घेता सद्यःस्थितीत नवीन प्रस्तावित भांडवली कामे हाती घेणे शक्य होणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले असून, विभागप्रमुखांना नवीन भांडवली कामाच्या नस्ती (फाइल) न पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत. 
 

कोरोनामुळे उत्पन्नाचे स्त्रोत आटल्याने भांडवली कामांसाठी पुरेसा निधी नाही. त्यामुळे कामांचा प्राधान्यक्रम निश्‍चित करून भविष्यात जमेच्या स्थितीचा पुन्हा आढावा घेऊन नवीन भांडवली कामे हाती घेण्यात येतील. 
- राधाकृष्ण गमे, आयुक्त, महापालिका

रिपोर्ट - विक्रांत मते 

संपादन - रोहित कणसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT