Death News esakal
नाशिक

Nashik News : बिल्डरच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

सातपूर : श्रमिकनगर परिसरातील एका बिल्डरच्या जाचाला वैतागून एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (ता. २) रात्री घडला. सदर बिल्डरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईपर्यंत, मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा कुटुंबीयांसह असंख्य नागरिकांनी घेतला होता. मात्र, सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर तणाव निवळला.


सातपूर श्रमिकनगर आयटीआय कॉलनीतील सचिन समाधान गांगुर्डे यांनी श्याम केदार नामक बिल्डर्स कडून प्लॉट विकत घेतला. त्या जागेवर घर बांधून राहत होते. अनेक वर्षे चकरा मारूनही सदर बिल्डर मात्र जागा नावावर करून देत नव्हता व ताबाही देत नव्हता. शुक्रवारी सदर बिल्डरला सचिन गांगुर्डे कुटुंबीय भेटले असता, या बिल्डरने जागेचा ताबा न देता घरे जेसीबीने उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली. यामुळे सचिन गांगुर्डे याने सायंकाळी आत्महत्या केल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांसह, कमलताई इंगळे यांनी केला आहे.

हेही वाचा: वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

घटनेनंतर संतप्त मृताच्या कुटुंबीयांसह असंख्य नागरिक सातपूर पोलिस ठाण्यात दाखल होत बिल्डर केदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी कुटुंबीयांना समजावून तत्काळ सदर बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. यानंतर तणाव निवळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT