NMC School esakal
नाशिक

Nashik NMC School: गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या शाळांना पारितोषिक! गुणवत्ता वाढविण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाचा उपक्रम

Nashik News : महापालिकेच्या शाळांमधील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, सुरक्षा रक्षक, कामाठी यांची आगामी शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासाठी इंदिरानगरच्या गुरुगोविंद सिंग महाविद्यालयात बैठक झाली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik NMC News : महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी दफ्तरमुक्त शनिवार उपक्रम यशस्वी करणारे तसेच गुणवत्ता वाढीसाठी काम करणाऱ्या महापालिकेच्या पहिल्या तीन शाळांना विशेष पुरस्कार देवून सन्मानित केले जाणार आहे. अशी माहिती शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी बी. टी. पाटील यांनी दिली. त्याचबरोबर शाळांना गुणवत्ता वाढीसाठी प्रवृत्त करताना दुसरीकडे शालेय शिस्त न पाळणाऱ्या शाळांवर कारवाईही केली जाणार आहे. (Nashik NMC school Prizes doing quality work news)

महापालिकेच्या शाळांमधील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, सुरक्षा रक्षक, कामाठी यांची आगामी शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासाठी इंदिरानगरच्या गुरुगोविंद सिंग महाविद्यालयात बैठक झाली. यावेळी प्रशासनाधिकारी पाटील यांनी मार्गदर्शन व सूचना केल्या. महापालिकेच्या शाळांमधील गुणवत्ता वाढविण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून तर शनिवारी दप्तरमुक्त शाळा हा उपक्रम राबविला जात आहे. त्याचबरोबर मोबाईल वापर कमी करण्यासाठीचा उपक्रमही मागील वर्षी उल्लेखनीय ठरला होता. महापालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला गेला.

यंदाही हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविला जाणार आहे. त्याचबरोबर शालेय गुणवत्ता वाढीसाठी उपाय योजना योजल्या जाणार आहेत. विद्यार्थी पटसंख्या वाढविणे, शाळांमध्ये प्रवेश उत्सव घेणे, शाळेची इमारत व साहित्य सुरक्षा करणे, शालेय साफसफाई, वर्ग व स्वच्छतागृहांची सफाई, शालेय परिसर सुशोभीकरण, शालेय पोषण आहाराचा दर्जा उंचाविणे, निवडणूक आचारसंहिता पाळणे, निवडणूक कामे जबाबदारीने पार पाडणे यासंदर्भात कामाठी व सुरक्षा रक्षकांना प्रशासनाधिकारी पाटील यांनी सूचना दिल्या. (Latest Marathi News)

मुख्याध्यापकांनी नेतृत्वगुण अवगत करण्याबरोबरच जबाबदारीने काम करण्याच्या सूचना दिल्या. शाळेची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांची असून येत्या काळात मुख्याध्यापकांना संपूर्णपणे सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. एप्रिल व मे महिन्यात सेवानिवृत्त होणाऱ्या केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक व कामाठींचा यावेळी सत्कार झाला. प्रास्ताविक बाळासाहेब कडलग यांनी केले तर ईश्वर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. सुनील खेडेकर यांनी आभार मानले.

विद्यार्थी गुणवत्ता यादीत यावेत

शाळांची गुणवत्ता वाढविण्याबरोबरच दप्तर मुक्त शाळेचा उपक्रम प्रभावीपणे व सामूहिकपणे राबविणाऱ्या शिक्षकांचा व शाळांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. शिक्षकांकडून चुका होणार नाही. याची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांची असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. पाचवी ते आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे नियोजन व त्यांना मार्गदर्शन करून जास्तीत-जास्त विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन प्रशासनाधिकारी पाटील यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway Station: "थोरले बाजीराव पेशवे पुणे स्टेशन… "; रेल्वे स्थानकावर झळकले बॅनर, राज्यात नवा वाद पेटला!

Latest Maharashtra News Updates : शिवरायांनी महाराष्ट्रात स्वराज्याचे संस्कार रुजवले- शाह

Ind Vs Eng: हेझलवूडचा सल्ला मानला अन् आकाश दीपनं उडवली इंग्लंडची भंबेरी, काय होतं सिक्रेट?

Kolhapur : भूत काढण्याच्या बहाण्याने बेदम चोप, भोंदूबाबाकडून प्रसादाच्या नावाने लूट; कोल्हापूर अंधश्रद्धेच्या अडकत आहे का?

Ahilyanagar Accident:'टाकळीमियाच्या दिंडीला भीषण अपघात'; पिकअपच्या धडकेत ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली; नऊ वारकरी जखमी

SCROLL FOR NEXT