jayant naiknavare
jayant naiknavare esakal
नाशिक

हिंसा भडकविण्यामध्ये बाहेरील व्यक्तींचा सहभाग : पोलिस आयुक्त नाईकनवरे

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : स्थानिक कुठलाही व्यक्ती हिंसा भडकविण्याचा प्रयत्न करत नाही. बाहेरील काही व्यक्ती येऊन हिंसा भडकवित कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून अशांतता पसरवत असतात, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी केले. पोलिस आयुक्तांकडून भद्रकाली पोलिस ठाण्यात विशेष शांतता समितीची बैठक शनिवारी (ता. १८) रात्री झाली.

.

सोशल मीडियाचा वापर करून आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांवर पोलिसांचे सायबर क्राईम विभाग लक्ष ठेवून आहे. अशा प्रकारचे मजकूर प्रसारित करणाऱ्यावर कारवाई केली जात आहे. शहरात शांततेचे वातावरण आहे. असेच वातावरण यापुढेही कायम ठेवावे. काही अडचणी असल्यास पोलिसांची मदत घ्यावी. पोलिस विभाग सतत तुमच्याबरोबर आहे. बऱ्याच वेळा आंदोलनाची संधी साधत काही बाहेरील व्यक्ती हिंसा भडकविण्याचे काम करत असतात. स्थानिक व्यक्ती मात्र गुण्यागोविंदाने राहत असतात. अशा बाहेरील समाजकंटकांना संधी देऊ नये, असेही आयुक्त म्हणाले. दरम्यान, शांततेच्या मार्गाने ईदगाह मैदान येथे नूपुर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्याची परवानगी मिळावी, अशा आशयाचे निवेदन सुन्नी मर्कज कमिटीतर्फे आयुक्तांना देण्यात आले. याबाबत बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले. या वेळी शहर- ए- खतीब हिसमोद्दीन खतीब, पोलिस उपायुक्त अमोल तांबे, विजय खरात, सहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना, वरिष्ठ निरीक्षक दत्ता पवार आदी उपस्थित होते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT