Police  esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : शहर-जिल्ह्याला पोलिस छावणीचे स्वरूप; पोलिसांचा कडेकोट पहारा

Nashik News : लोकसभा निवडणुकीतील नाशिक, दिंडोरी मतदारसंघात शनिवारी (ता. १८) सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावताच शहर-जिल्ह्यातील पोलिसांनी आगामी दोन दिवसांसाठी कडेकोट पहाऱ्याची सज्जता केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : लोकसभा निवडणुकीतील नाशिक, दिंडोरी मतदारसंघात शनिवारी (ता. १८) सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावताच शहर-जिल्ह्यातील पोलिसांनी आगामी दोन दिवसांसाठी कडेकोट पहाऱ्याची सज्जता केली आहे. शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत सुमारे चार हजार पोलिस अंमलदार-अधिकारी. तर नाशिक जिल्ह्यात सुमारे नऊ हजार पोलिस अंमलदार-अधिकाऱ्यांच्या सशस्त्र बंदोबस्तासह रविवारी (ता. १९) पहाटे मतदान केंद्रांचा (बूथ) ताबा घेणार आहेत. (Nashik Lok Sabha Election)

यामुळे जिल्ह्यातच नव्हे, तर शहराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नाशिक, दिंडोरी आणि धुळे मतदारसंघासाठी सोमवारी (ता. २०) मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील मतदान केंद्रनिहाय पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, तर ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीणमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्ताची सज्जता करण्यात आलेली आहे.

नाशिक शहर आयुक्तालय हद्दीत एक हजार २२७ मतदान केंद्रे असून, त्यासाठी सुमारे चार हजार पोलिस अंमलदार-अधिकाऱ्यांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश राज्यातील राखीव पोलिस दलाचे एक हजार अंमलदार, गृहरक्षक दलाचे एक हजार जवान‌ यांच्यासह लातूर, गोंदिया, गडचिरोली येथील पोलिस अंमलदार.

नागपूर प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलिस अंमलदार आणि शहर आयुक्तालयाचे दोन हजार अंमलदार-अधिकारी असा फौजफाटा नाशिकमध्ये दाखल झाला असून, रविवारी (ता. १९) सकाळी अंमलदार आपापल्या बूथवर रवाना होतील. (latest marathi news)

ग्रामीणमध्ये नऊ हजारांचा फौजफाटा

नाशिक ग्रामीणमध्ये दिंडोरी आणि धुळे मतदारसंघातील काही भाग समाविष्ट आहे. यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांकडून सुमारे नऊ हजार पोलिस अंमलदार- अधिकाऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त राहील. परराज्यांतील तीन हजार, तर नाशिक ग्रामीणचे तीन हजार पोलिस अंमलदार-अधिकारी.

तसेच केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातील ‘सीआरपीएफ’च्या १४ तुकड्या, ‘एसआरपीएफ’च्या दोन तुकड्यांसह कडेकोट फौजफाटा तैनात असणार आहे. जिल्ह्यात तीन हजार ५७३ मतदान केंद्रे (बूथ) असून, सशस्त्र बंदोबस्तासह ६०० वाहने सज्ज आहेत.

स्ट्राँग रूमसाठी सशस्त्र ‘सीआरपीएफ’

मतदान प्रक्रिया संपल्यावर सीलबंद इव्हीएम अंबड औद्योगिक वसाहतीतील शासकीय गुदामातील स्ट्राँग रूममध्ये ठेवले जाणार आहेत. या स्ट्राँग रूम परिसरासाठी सशस्त्र ‘सीआरपीएफ’च्या दोन तुकड्यांचा मतमोजणीपर्यंत बंदोबस्त राहील. याशिवाय, पोलिसांचाही पहारा असणार आहे.

शहर आयुक्तालय हद्दीतील बंदोबस्त

- पोलिस आयुक्त : १

- उपायुक्त : ४

- सहाय्यक आयुक्त : ७

- उपनिरीक्षक ते पोलिस निरीक्षक : २२५

- पोलिस अंमलदार : २,३५०

- प्रशिक्षणार्थी अंमलदार : ४७०

- गृहरक्षक दलाचे जवान : १,०००

- सीआरपीएफ : ५ प्लाटून

- एसआरपीएफ : २ प्लाटून

ग्रामीण पोलिसांचा बंदोबस्त

- पोलिस अधीक्षक : १

- अप्पर अधीक्षक : २

- अंमलदार ते पोलिस निरीक्षक : ३,०००

- परराज्यांतील अंमलदार : ३,०००

- सीआरपीएफ : १४ प्लाटून

- एसआरपीएफ : २ प्लाटून

- वाहने : ६००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT