Nashik Speciality Laboratory joins hands with OncQuest nashik news sakal
नाशिक

Nashik News : नाशिक स्पेशालिटी लॅबोरेटरीची ‘ऑनक्वेस्ट’ सोबत हातमिळवणी; चाचण्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्‍ध

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : ऑनक्वेस्ट लॅबोरेटरीज लिमिटेडने महाराष्ट्रातील कामकाज वाढविण्यासाठी नाशिक स्पेशालिटी लॅबोरेटरीसोबत हातमिळवणी केली आहे. या माध्यमातून उत्तर- पश्चिम महाराष्ट्रातील चिकित्सक, रुग्णालयांच्या प्रगत चाचणीच्‍या गरजा पूर्ण करणे, कर्करोग निदान आणि विशेष चाचणी सेवा उपलब्‍ध होणार आहे. (Nashik Speciality Laboratory joins hands with OncQuest nashik news)

यासंदर्भात उंटवाडी रोडवरील नाशिक स्‍पेशालिटी लॅबोरेटरीच्‍या प्रांगणात झालेल्‍या पत्रकार परिषदेत सविस्‍तर माहिती दिली. तत्‍पूर्वी लॅबचे उद्‌घाटन एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचे प्रमुख व कर्करोग तज्‍ज्ञ डॉ.राज नगरकर यांच्‍या हस्‍ते झाले.

कर्करोगाचे निदान प्राथमिक स्‍तरावर होणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. त्‍यासाठी आधुनिक तंत्रावर आधारित लॅब उपयुक्‍त ठरतील, असा विश्‍वास यावेळी व्‍यक्‍त केला. याप्रसंगी नाशिक कॅन्सर सेंटर ॲन्ड ॲपेक्स वेलनेस, नाशिकचे कन्सल्टंट मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. शैलेश बोंडार्डे उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्‍यांनी प्रगत निदानाच्या आवश्‍यकतेविषयीची माहिती दिली. नाशिक स्पेशालिटी लॅबोरेटरीचे संचालक डॉ. धनंजय डबीर म्‍हणाले, की शहरात सर्वोत्कृष्ट निदान सेवा देण्यासाठी भागीदार शोधत होतो. ऑनक्वेस्टच्‍या माध्यमातून आमचा शोध पूर्ण झाला आहे. आता या भागिदारीसोबत आम्‍ही गुणवत्तापूर्ण चाचणीची सुविधा उपलब्‍ध करून देऊ, असे त्‍यांनी नमूद केले.

ऑनक्वेस्टचे मुख्य व्‍यवसाय अधिकारी दीपांशु सन्न्याल म्‍हणाले, की या धोरणात्मक भागीदारीद्वारे ऑनक्वेस्टने महाराष्ट्रात विस्‍ताराचे धोरण आखले आहे. मुंबईत कार्यरत असताना आता संपूर्ण राज्‍यभरात विविध ठिकाणी विस्‍तार केला जाणार असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घ्या, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Latest Marathi News Updates : ओबीसींचा बॅकलॉग तातडीने भरावा; सरकारचा जीआर वादग्रस्त – छगन भुजबळ

Smriti Mandhana: शाब्बास पोरी! स्मृती मानधनाचा जगभरात दबदबा, वन डे वर्ल्ड कपपूर्वी ICC ने दिली आनंदाची बातमी

Gemini Retro Saree Trend होतोय खूप व्हायरल; पण फोटो बनवताना अजिबात करू नका 'या' 5 चुका, नाहीतर इमेज खराब होणारच

Hidden Story: समुद्राखाली दडलेलं सोनं-चांदीपेक्षा मौल्यवान काय आहे? भारत उलगडणार रहस्य, चावी मिळाली

SCROLL FOR NEXT