zopadpatti  esakal
नाशिक

Nashik Summer Heat : शहरात झोपडपट्ट्यांत छप्पर फाडके ऊन

Summer Heat : थंड हवेचे ठिकाण म्हणून नावलौकीक असलेले नाशिक सध्या तापमान चाळिशीपर्यंत पोचल्याने हॉट स्टेशनच्या यादीत आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Summer Heat : थंड हवेचे ठिकाण म्हणून नावलौकीक असलेले नाशिक सध्या तापमान चाळिशीपर्यंत पोचल्याने हॉट स्टेशनच्या यादीत आले आहे. शहरात उष्णतेचा दाह सर्वाधिक कोणाला सहन करावा लागतं असेल तर तो झोपडपट्टीवासीयांना. दुपारी बारानंतर सूर्याची किरणे छप्पर फाडून थेट घरात शिरत असल्याने घरात थांबणे मुश्‍कील झाले आहे. रात्री अंधार असला तरी तापलेले छप्पर व दुपारच्या उष्णतेमुळे गरम झालेल्या घरातील कपडे स्वस्थ बसू देत नाही. (nashik summer heat Slum dwellers suffer most from heatstroke in city marathi news)

त्यामुळे दुपारचा स्वयंपाक झाडाच्या सावलीखाली होतो, तसे रात्रीची पसारी रस्त्याच्या कडेला किंवा आडोशाला होते. थंड हवेचा नावलौकीक नाशिकला असला तरी वाढत्या तापमानाची झळ नाशिकला बसतं आहे. मेच्या मध्यावर किंवा अखेरीस तापमान सरासरी पातळी गाठते. तेदेखील चार ते पाच दिवस. परंतु, यंदा मार्चमध्येच चाळिशीपर्यंत तापमान पोचले. त्यामुळे एप्रिल व मे सर्वाधिक हॉट राहतील, असा दाट अंदाज आहे.

उन्हाळ्यात उष्णतेचा सर्वाधिक दाह झोपडपट्टीवासीयांना सहन करावा लागतं आहे. उन्हापासून वाचण्यासाठी छप्पर असले तरी उन्हाचा चटका इतका तीव्र आहे की, छप्पर फाडून किरणे घरातील जमिनीपर्यंत पोचतात. त्यामुळे घरामध्ये थांबणे मुश्‍कील आहे. उन्हाची तीव्रतेमुळे घरातील टेबल पंखेदेखील निकामी ठरत आहे. लोखंडी पत्रे असलेल्या झोपडीमध्ये उन्हातच दिवस घालविण्याचा अनुभव येत आहे.

कृत्रिम थंड हवेची ठिकाणे

उष्णतेच्या वाढता पारा हैराण करून टाकणारा असल्याने शहरात कृत्रिम थंड हवेची ठिकाणे निर्माण झाली आहेत. त्यामुळे कामाचे निमित्त साधून अशा ठिकाणी गर्दी होताना दिसते. जसे की, एटीएम, बँका, खासगी कार्यालये, मेडीकल, मॉल, सिनेमागृहे आदी ठिकाणी वातानुकूलित यंत्रणा असल्याने ग्राहक बराच वेळ या ठिकाणी घालवताना दिसतात.  (latest marathi news)

त्वचेचे विकार

उन्हामुळे त्वचेच्या विकारांना झोपडपट्टीवासीयांना सामोरे जावे लागतं आहे. शरीरावर बुरशीजन्य आजाराचे प्रमाण वाढतं आहे. शरारीवर लालसर पुरळ, त्वचा भाजून काळी पडणे, शरीरावर पांढरे चट्टे दिसणे असे त्वचा विकारांना सामोरे जावे लागतं आहे.

फ्लॅटमधील स्थिती समाधानकारक

झोपडपट्टीच्या तुलनेत इमारतींमधील स्थिती समाधानकारक आहे. शेवटच्या म्हणजे सर्वांत वरच्या मजल्यावरील फ्लॅटधारकांना तापलेल्या स्‍लॅबमुळे उष्णतेचा ताप अधिक जाणवतो, तर खालच्या मजल्यावर खोल्यांमधील हवा गरम होत नाही तोपर्यंत पंख्यांवर काम भागते.

सद्यःस्थितीत झोपडपट्ट्यांची स्थिती (२०११ च्या सर्वेक्षणानुसार)

शहरातील एकूण झोपडपट्ट्या- १५९ घोषित - ५५

अघोषित - १०४

घोषित झोपडपट्ट्यांमधील झोपड्या- २०,८८५

घोषित झोपडपट्ट्यांमधील नागरिक- ९७,१२६

अघोषित झोपडपट्ट्यांमधील झोपड्या- २०,५२२

अघोषित झोपडपट्ट्यांमधील नागरिक- ९५,८३३

खासगी जागेतील झोपडपट्ट्या- ११४

महापालिकेच्या जागेतील झोपडपट्ट्या- १५

शासकीय जागांवरील झोपडपट्ट्या- ३०

मागील नऊ दिवसातील तापमान

तारीख किमान कमाल

२५ मार्च २०.४ ३७.७

२६ मार्च २०.२ ३८.३

२७ मार्च २१.८ ३९.४

२८ मार्च २१.५ ३९.२

२९ मार्च २३.४ ३७.४

३० मार्च २२.० ३७.०

३१ मार्च २१.७ ३७.६

१ एप्रिल २१.३ ३७.८

२ एप्रिल १८.६ ३८.२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Price : आला रे आला, आयफोन आला! iPhone 17, 17 Pro अन् Pro Max स्मार्टफोन भारतात कितीला? किंमत पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच; बघाल तर प्रेमात पडाल, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT