The encroachment department of the Municipal Corporation is taking action to remove drug spots in schools and colleges esakal
नाशिक

NMC News: अनधिकृत दुकाने, 27 पानटपऱ्या जप्त

सकाळ वृत्तसेवा

NMC News : शहरात अमलीपदार्थांचे रेकॉर्ड उघडकीस आल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून शाळा व महाविद्यालयांना लागून असलेल्या अनधिकृत दुकाने व २७ पानटपऱ्या जप्त केल्या. (NMC encroachment removal department Unauthorized shops 27 pantapris seized nashik)

एमडी ड्रग्ज विक्रीचे रॅकेट नाशिकमध्ये उघडकीस आल्यानंतर राज्यभर नाशिकची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिकची प्रतिमा सुधारण्यासाठी महापालिका व पोलिसांना ॲक्शन मोडवर येण्याच्या सूचना दिल्या.

त्या अनुषंगाने बुधवारी (ता.१८) कॉलेज रोड व गंगापूर रोड भागातील नऊ संशयित कॅफेवर धाड टाकून तपासणी केली. महापालिका विविध कर विभागाने अनधिकृत पानटपऱ्या हटविण्याच्या मोहीम हाती घेतली.

शहरातील महाविद्यालय व शाळांच्या परिसरात असलेल्या अनधिकृत टपऱ्या जप्त करण्यात आल्या. पूर्व पश्चिम व पंचवटी विभागात पहिल्या टप्प्यात कारवाई करण्यात आली असून, शुक्रवारी (ता. २०) सिडको सातपूर व नाशिक रोड भागात कारवाई केली जाणार आहे.

गुरुवारी शाळा व महाविद्यालयांच्या आजूबाजूला असलेल्या २७ टपऱ्या जप्त केल्या. गुरुवारी नऊ कॅफेंवर महापालिकेच्या पथकाने धाड टाकली.

त्यात अनधिकृत बांधकामाची तपासणी केली. बहुतांश ठिकाणी बांधकाम अनधिकृत वाढविल्याचे समोर आले. बांधकाम हटविण्याच्या किंवा दंड भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kidney Trafficking: किडनी विक्री प्रकरणातील एजंट ‘डॉ. कृष्णा’ निघाला इंजिनिअर, सोलापुरात केली अटक; बनावट नावाने पीडित शोधायचा

High BP and Pregnancy: उच्च रक्तदाब असल्यास शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती; कामा रुग्णालयातील डॉक्टरांचा अभ्यास

Jalna Crime: कारमधील मृत्यूचा उलगडा; पंचवीस लाखांची सुपारी देऊन खून, जालन्यातील प्रकरण, दोन संशयितांना पोलिस कोठडी

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! ई-पीक पाहणी न झालेल्यांसाठी आता ऑफलाइन नोंद; नेमकं काय करावे लागणार?

Radio Ceylon: रसिकांना रिजवणाऱ्या ‘रेडिओ सिलोन’नेची शताब्दी; भारतासह जगभरात लोकप्रिय, ‘बिनाका गीतमाला’सह गाजले अनेक कार्यक्रम

SCROLL FOR NEXT