Parking  esakal
नाशिक

Nashik : गावठाणातील नागरिकांची मालमत्ता रस्त्यावर

विक्रांत मते

नाशिक : सध्या अन्न वस्त्र, निवाऱ्यासोबतच चारचाकी वाहनही गरज बनली आहे. त्या अनुषंगाने विचार केल्यास जुने नाशिक, मध्य नाशिक व पंचवटी भागातील नागरिकांना रात्रीच्या वेळी घर सोडून मुख्य रस्त्यावर वाहने पार्किंग करण्याची वेळ आली आहे. महापालिकेने पार्किंगचे लॉट्स विकसित न केल्याचा हा परिणाम आहे. (NMC not developing parking lots in village Nashik Latest Marathi News)

शहरात जुने नाशिक, मध्य नाशिक व पंचवटी या गावठाण भागात चारचाकी वाहनांच्या पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. दर दोन ते तीन घरांमध्ये चारचाकी वाहन उपलब्ध आहे. चारचाकी वाहन सोबत असण्याची वस्तू आहे. त्यामुळे घराच्या मागेपुढे म्हणजेच डोळ्यासमोर चारचाकी वाहन असल्यास वाहन मालकदेखील निवांत असतो.

गावठाणातील नागरिकांच्या नशिबी मात्र हे सुख नाही. गावठाणातील अरुंद रस्ते व मोकळी मैदानी नसल्याने वाहने पार्किंग करता येत नाही. त्यासाठी मुख्य रस्ते किंवा चौकांमध्ये वाहने पार्किंग केली जातात. पायाभूत सुविधा विकसित न झाल्याने लाखो रुपयांचे प्रॉपर्टी रात्रीच्या वेळी रस्त्यावर ठेवावी लागते.

पार्किंग स्थळे विकसित करण्याची जबाबदारी

गावठाण भागात नव्याने विकास करणे अशक्य आहे. राज्य शासनाने क्लस्टर डेव्हलपमेंटला मान्यता देताना जुन्या वाड्यांसाठी चार एफएसआय दिल्यास पार्किंगसह रुंद रस्ते, खेळाचे मैदान व उद्यानासाठी जागा उपलब्ध होऊ शकते. शासनाने चार एफएसआयची मागणी मान्य केली तरी विकासासाठी अधिक कालावधी लागेल. मात्र, गावठाणाच्या आजूबाजूला पार्किंग लॉट्‌स उपलब्ध करणे किंवा बहुमजली पार्किंग उपलब्ध करून दिल्यास गावठाणातील नागरिकांच्या वाहनांची मालमत्ता सुरक्षित राहील.

कालिदास कलामंदिर समोरील भालेकर हायस्कूल मैदान, शताब्दी हॉस्पिटल खालील भूमिगत पार्किंग, गोल्फ क्लब मैदान, कॅनडा कॉर्नर सिग्नलजवळील भूमिगत पार्किंग, सीबीएस येथील जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा न्यायालयाच्या समोरील रस्त्यावरची पार्किंग जागा वगळता अधिकृत अशा पार्किंग जागा नाही. पार्किंग जागा उपलब्ध करण्याची जबाबदारी महापालिकेची असतानाही रस्त्यांवर करोड रुपये खर्च करणाऱ्या महापालिकेकडून महत्त्वाच्या समस्येकडे दुर्लक्ष केले जाते.

या आहेत पार्किंगच्या जागा

रविवार कारंजा भागातील नागरिकांना रात्रीच्या वेळी चारचाकी वाहनांची पार्किंग रविवार कारंजा, शनी गल्ली व त्याला लागून असलेल्या लेनमध्ये करावी लागते. घनकर लेन भागातील पार्किंग महात्मा गांधी रस्त्यावर होते. पंचवटी गावठाणातील पार्किंग गंगाघाट परिसरात केली जाते. काझीपुरा बागवानपुरा, नानावली या भागातील पार्किंग दूध बाजार परिसरात होते. धुमाळ पॉइंट या भागातील पार्किंग सांगली सिग्नल चौकात केली जाते.

"जुने नाशिक गावठाण परिसर म्हणून ओळखला जातो. येथे अतिशय अरुंद रस्ते आणि भाग आहे. त्यामुळे कुठेही पार्किंगची व्यवस्था नाही. खरेदीसाठी आल्यास वाहन पार्किंगची समस्या निर्माण होते. रस्त्यास लागून वाहने पार्क केल्यावर पोलिसांच्या कारवाईचा मनस्ताप सहन करावा लागतो." - माजीद पीरजादा, नागरिक

"जुने नाशिक परिसर गावठाण तसेच मुख्य बाजारपेठदेखील आहे. विविध भागातील नागरिक या भागात कामानिमित्त येतात. अशा वेळेस व्यवसायिकांच्या दुकानासमोर वाहने पार करून तासनतास निघून जातात. ग्राहकास दुकानात येण्यास मार्ग राहत नसल्याने व्यवसायावर परिणाम होतो. दहिपूल परिसरात वाहन पार्किंगची मोठी समस्या आहे."

- भूषण कमोद, व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Municipal Election : नाशिक महापालिकेत आघाडीत बिघाडी? मनसेच्या एन्ट्रीवरून शिवसेना-काँग्रेसमध्ये जुंपली!

Kalyan Traffic: कल्याणमध्ये वाहतुकीत बदल! 'हा' महत्त्वाचा पूल २० दिवस बंद, काय असतील पर्यायी मार्ग?

Hrithik Roshan Uttarakhand Trek: हृतिक रोशनने अनुभवला उत्तराखंडच्या डोंगरांचा निसर्गमय ट्रेक; चाहत्यांनी विचारलं ‘जादू मिला क्या?

तरुणी नशेत बेधूंद होऊन घरी आली, घरमालकानं पाहिलं अन् मागून येऊन...; पीजी मालकाचं भयंकर कृत्य; पुणे हादरलं

Ichalkaranji Pollution : औद्योगिक प्रगतीच्या सावलीत इचलकरंजीचा श्वास कोंडतोय; वायू प्रदूषणाने आरोग्याचा गंभीर इशारा

SCROLL FOR NEXT