no qurbani on bakra eid due to ashadhi ekadashi by muslim brothers nashik news esakal
नाशिक

Ashadhi Ekadashi Bakri Eid : आषाढी एकादशीमुळे बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी नाही; जपला धार्मिक आदरभाव!

सकाळ वृत्तसेवा

Ashadhi Ekadashi Bakri Eid : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशी आणि मुस्लिम धर्मियांचा बकरी ईद हा महत्त्वाचा सण दि. २९ जून रोजी एकाच दिवशी येत आहे. (no qurbani on bakra eid due to ashadhi ekadashi by muslim brothers nashik news)

महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभली आहे. आषाढी एकादशी हा वारकऱ्यांचा मोठा उत्सव असतो. यंदा याच दिवशी बकरी ईदचा देखील सण आहे. धार्मिक सहिष्णुता व एकमेकांच्या परंपरांचा आदर करण्यासाठी बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव कोणतीही प्राणी हत्या करून कुर्बानी देणार नाही.

या दिवशी धार्मिक महत्त्व असलेला कुर्बानीचा कार्यक्रम पुढच्या दोन दिवसात करण्यात येईल. असा ठराव वावी पोलीस ठाण्यात आयोजित शांतता समिती व मोहल्ला समितीच्या बैठकीत मुस्लिम बांधवांनी केला.

कुर्बानीचा कार्यक्रम धार्मिक परंपरेत सांगितल्याप्रमाणे पुढच्या दोन दिवसात केला जाईल अशी ग्वाही मुस्लिम बांधवांच्या वतीने शांतता समितीच्या बैठकीत देण्यात आली. वावी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली आषाढी एकादशी व बकरी ईद उत्सवांच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावण्यात आली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

वावी, पाथरे, पांगरी, नांदूर शिंगोटे, चास, दापूर येथील हिंदू-मुस्लिम समाजबांधव यावेळी उपस्थित होते. एकमेकांचे धार्मिक सण आणि उत्सव सलोख्याने साजरे करण्याची परंपरा वावी परिसरातील सर्व धर्मीय समाज बांधवांनी जपली आहे.

यंदा आषाढी एकादशीच्या दिवशी या दिवसाचे महत्त्व जपत बकरी ईदची कुर्बानी न देण्याचा ठराव सिन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष इलाहीबक्ष शेख यांनी मांडला त्यास डॉ. शकील कादरी यांनी अनुमोदन दिले.

वावीचे सरपंच विजय काटे यांनी मुस्लिम धर्मियांनी घेतलेल्या या भूमिकेचे स्वागत केले. यापुढील काळात एकमेकांचे सण उत्सव असेच सलोख्याने साजरे करूया असे श्री. काटे यांनी सांगितले.

पोलीस उपनिरीक्षक रामनाथ तांदळकर, माजी उपसरपंच फरीद अत्तार, विजय सोमाणी, विनायक घेगडमल, रफिकभाई इनामदार, फिरोज इनामदार, शाहरुख इनामदार, पत्रकार अजित देसाई,संतोष भोपी, सिराज काद्री, लक्ष्मण नवले, आकाश वेलजाळी, साहिल मणियार, गणी सय्यद, इम्रान इनामदार, किरण संधान, बाळासाहेब निकम आदींसह पोलीस ठाणे स्तरीय शांतता समितीचे सदस्य व सर्वधर्मीय समाजबांधव यावेळी उपस्थित होते.

"प्रत्येक समाज घटकाला आपले सण उत्सव धार्मिक परंपरेनुसार साजरा करण्याचा अधिकार आहे. वारकरी संप्रदायात असलेले आषाढी एकादशीचे महत्त्व लक्षात घेऊन मुस्लिम बांधवांनी या दिवशी प्राणी हत्या टाळून कुर्बानीचा विधी न करण्याचा निर्णय घेतला. हा स्तुत्य उपक्रम आहे. वावी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात आजपर्यंतचा इतिहास बघितला तर धार्मिक तेढ कुठेही नाही. या पुढील काळातही सर्वांनी अशाच पद्धतीने सामाजिक सलोखा जपला पाहिजे. " - चेतन लोखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस! पवई तलाव ओव्हरफ्लो, ७ जलाशयातील पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट समोर

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

Jagannath Puri Rath Yatra 2026: कधी आहे जगन्नाथ पुरी रथयात्रा 2026? जाणून घ्या योग्य तारीख, महत्त्व आणि परंपरा

SCROLL FOR NEXT