Guardian Minister Dada Bhuse inspecting the work of the new building of Zilla Parishad on Monday.
Guardian Minister Dada Bhuse inspecting the work of the new building of Zilla Parishad on Monday. esakal
नाशिक

Nashik News: नवीन प्रशासकीय इमारतीस ऑक्टोबरची डेडलाईन! दादा भुसे यांच्याकडून कामाची पाहणी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : विविध अडथळ्यांची शर्यत पार करत सुरू असलेल्या जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे कासवगतीने सुरू असलेल्या कामावर पालकमंत्री दादा भुसे यांनी काहीसा नाराजीचा सूर आवळला.

मात्र, सदर कामांना गती देऊन पहिल्या टप्प्यातील तीन मजल्यांचे इमारतीचे काम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी झाले पाहिजे असे सांगत, त्यासाठी संबंधित ठेकेदारास काम पूर्ण करण्यासाठी ऑक्टोबरपर्यंतची डेडलाईन पालकमंत्री भुसे यांनी दिली आहे. (October deadline for new administrative building Inspection of work by Dada Bhuse Nashik News)

त्र्यंबकरोडवरील एबीबी सर्कल येथील जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतींच्या सुरू असलेल्या कामाची सोमवारी (ता. ८) पालकमंत्री भुसे यांनी पाहणी केली. जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल,

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय सोनवणे, उदय सांगळे, क्रांती कन्स्ट्रक्शनचे संचालक अभिजित बनकर आदी उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी सर्व इमारतीची माहिती दिली. पालकमंत्री भुसे यांनी इमारतीच्या बांधकामास मंजुरी कधी मिळाली, काम कधी सुरू झाली अशी विचारणा केली. त्यावर २०१९ मध्ये मंजुरी प्राप्त होऊन प्रत्यक्षात २०२० मध्ये कामाला प्रारंभ झाल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्यावर, काम अतिशय संथगतीने सुरु असून आता लवकर आवरा अशा सूचना भुसे यांनी यावेळी दिल्या. जानेवारी २०२४ पर्यंत काम पूर्ण होईल असे सांगण्यात आले असता, पालकमंत्री भुसे यांनी तो मोठा कालावधी आहे.

हे काम जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वीच होणे आवश्यक असल्याचे सांगितले. मंजुरीप्रसंगी असलेले इमारतीचा बाह्य आराखडा (स्ट्रक्चर) अन प्रत्यक्षात आता असलेल्या आराखड्यात बदल झालेला आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर असलेला आराखडा याठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे एकदा त्याचा देखील अभ्यास करावा असे त्यांनी सुचविले. समोरच्या मोकळ्या जागेचा वापर काही सार्वजनिक कार्यक्रम करण्यासाठी करता येईल का याची शक्यता तपासून घ्यावी असेही भुसे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT