redevelopment of old societies sakal
नाशिक

Nashik News : जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; 30 हजाराहून अधिक इमारती 40 वर्षांपेक्षा जुन्या

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जुन्या इमारतींचा पुनर्विकास करताना ५१ टक्के सभासदांची परवानगी असल्यास विकास करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याअनुषंगाने नाशिक गावठाणात मोडकळीस आलेल्या वाड्यांचा पुनर्विकास तसेच जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. विरोधात असलेल्या सभासदांच्या मागणीचा विचार न करतादेखील जुने इमारत पुनर्विकासासाठी उपलब्ध होणार आहे.

इमारतींचा पुनर्विकास करताना मालक व भाडेकरू हा वाद अडचणीचा ठरतो. परिणामी पुनर्विकास होत नाही. वर्षानुवर्षे इमारत तशीच पडून राहते व दुर्घटना घडण्याची शक्यता अधिक वाढते. (Old buildings can be redeveloped with consent of majority of members nashik news)

नाशिक महापालिका हद्दीतील पंचवटी व जुने नाशिक भागात अनेक धोकादायक इमारती आहे. मालक व भाडेकरू वादामुळे इमारतींचा पुनर्विकास होत नाही. त्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिटदेखील वादामुळे होत नाही.

वास्तविक १०० वर्षांपेक्षा अधिक जुने वाढे असल्याने त्या वाड्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करूनही उपयोग नाही. वाड्यांप्रमाणेच शहरात जवळपास ३० हजाराहून अधिक इमारती ४० वर्षांपेक्षा जुन्या आहे. त्या इमारतीदेखील पुनर्विकासासाठी पात्र आहे. शहरातील टीपी स्कीम क्रमांक एक व दोन तसेच टिळकवाडी, पंडित कॉलनी, तिडकेनगर, गंगापूर रोडवरील सहा मीटर रस्त्यावरील इमारती पुनर्विकासासाठी पात्र आहे.

परंतु वाडे व जुन्या इमारतींमध्ये भाडेकरू व मालकांमध्ये वाद आहे. त्या वादामुळे इमारतींचे व वाड्यांचे पुनर्विकास रखडला आहे. राज्य शासनाने ७ जुलै २०१८ मध्ये करण्यात आलेल्या सुधारणात बदल करण्यास नुकतीच राज्याच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यानुसार पुनर्विकास पात्र ठरत असलेल्या इमारती व वाड्यांमध्ये बहुसंख्य सभासदांची संमती असल्यास पुनर्विकास करता येणार आहे.

म्हाडाच्या नियमांमध्ये इमारतीच्या पुनर्विकासास विरोध असलेल्या सभासदांना काढून टाकण्याची तरतूद आहे. तसेच तरतूद गृहनिर्माण विभागाच्या महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्टमध्ये नव्हती. ती तरतूद करण्यात आल्याने जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

विभाग धोकादायक घरे, वाडे

पश्चिम ६००

पंचवटी १९८

पूर्व ११७

नाशिक रोड ६९

सातपूर ६८

सिडको २५

एकूण १०७७

शहरातील एकूण मिळकती- ५ लाख ८५ हजार.

- पुनर्विकास पात्र मिळकती- सुमारे ४५, ०००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT