Accident News esakal
नाशिक

Nashik Accident News : दुचाकी अपघातात एक ठार; दोन जखमी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Accident News : दोन दुचाकींत झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन जण जखमी झाले. इंदिरानगर येथील साईनाथनगर परिसरात ही घटना घडली. अनिल विश्वनाथ सावंत (रा. ३३ शिवाजीवाडी, विनयनगर) असे मयत दुचाकीस्वारांचे नाव आहे. (One killed two injured in two wheeler accident nashik news)

चार्वाक चौकाकडून साईनाथनगर सिग्नलकडे दुचाकीने ट्रिपल शीट जात होते. तर दुचाकीवरून अनिल सावंत हे येत येत होते. या वेळी दुचाकींची समोरासमोर धडक दिल्याने अपघात झाला. यातील दुचाकी चालक अनिल सावंत यांचा अतिरक्तस्रावाने जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळतात स्थानिक नागरिकांनी जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले.

पोलिसांनी तत्काळ दाखल होत घटनेचा पंचनामा करून जखमींना उपचार अर्थ पाठवले. तर या अपघातातील अन्य दोन जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती इंदिरानगर पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अपघात घडल्यानंतर येथे खासगी रुग्णवाहिका आली. या रुग्णवाहिकेत असलेल्या चालकासह डॉक्टर यांनी या अपघातग्रस्तांना आमच्या रुग्णालयात दाखल करणार असाल तरच आम्ही घेऊन जाऊ, असे सांगितले. प्रसंगी जमलेल्या नागरिकांचा रोष बघत व पोलिसांनी केलेल्या मध्यस्थीनंतर रुग्णांना रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.

याबाबत शिवसेनेचे (ठाकरे गट) पदाधिकारी ऋषिकेश वर्मा व वसीम सय्यद यांनी या गैरप्रकाराबाबत इंदिरानगर पोलिसात सदर रुग्णवाहिका चालक व डॉक्टर यांच्याविरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT