Dada Bhuse Addressing Farmers Movement esakal
नाशिक

Nashik News : कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन मागे; पालकमंत्री भुसे यांची शिष्टाई यशस्वी

सकाळ वृत्तसेवा

लासलगाव (जि. नाशिक) : कांदा उत्पादक शेतकरी ठिकठिकाणी आंदोलन करत आहे. कांद्याला भाव नसल्याने शेतकरी संतप्त झाले. सकाळपासून कांदा उत्पादक शेतकरी विविध मागण्या घेवून आंदोलनास बसले होते.

शेतकऱ्यांनी आक्रमक होत लासलगाव कांदा लिलाव बंद पाडले. या आंदोलनाची दखल घेत पालकमंत्री थेट आंदोलन स्थळी पोहचले व आंदोलक शेतकऱ्यांची चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घेत येत्या आठ दिवसांत बैठकीचे आश्र्वासन देत शेतकऱ्यांना दिलासा दिला पालकमंत्र्यांची तत्परता बघून शेतकऱ्यांनी विश्वास ठेवत आंदोलन मागे घेतले. (Onion Farmers take agitation Back Guardian Minister Bhuses politeness successful at lasalgaon Nashik News)

पालकमंत्री भुसे म्हणाले की येत्या आठवड्याभरात मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या शिष्ट मंडळा सोबत बैठक घेवून शेतकऱ्यांच्या मागण्या सकारात्मकपणे मांडू.

शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला सर्व परिस्थितीची जाणीव असून लवकरात लवकर कांद्याचे दर सुस्थितीत कसे येथील आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या...

महाराष्ट्रातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारकडे 'खालील काही प्रमुख मागण्या केल्या आहेत.

१) महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र कांदा महामंडळ स्थापन करावे आणि त्यासाठी ५ हजार कोटी रुपयांची तरतूद करावी.

२) कोणत्याही अटी शर्ती शिवाय जानेवारी २०२२ पासून विक्री केलेल्या कांद्याला सरसकट १५०० रुपये अनुदान द्यावे.

(३) नाफेडच्या माध्यमातून खरेदी करण्यात येणार असलेल्या कांद्याला ३० रुपये प्रति किलो दर द्यावा.

(४) जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्यासाठी कायमस्वरूपी कांदा निर्यात धोरण तयार करावे.

(५) कांद्याला कवडीमोल दर मिळाल्यामुळे शेतकरी कर्जाची परतफेड करु शकत नाही म्हणून

संपूर्ण पीक कर्ज १००% माफ करावे.

६) राज्यातील प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये सरकारने कांदा प्रक्रिया उद्योग सुरू करावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Price : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारकडून उसाच्या किमतीत वाढ, आता एका क्विंटलमागे किती रुपये मिळणार?

World Cup 2025, IND vs ENG: भारताला पराभूत करत इंग्लंडने मिळवलं सेमीफायनलचं तिकीट! हरमनप्रीत कौर-स्मृती मानधनाची झुंज व्यर्थ

Worli Fire: वरळीत भीषण आग! अनेक झोपड्या जळाल्या, आगीमागचं नेमकं कारण आलं समोर

Pune Fire : सदाशिव पेठेतील चव्हाण वाड्याला भीषण आग, चार घरांचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली

World Cup 2025, INDW vs ENGW: दीप्ती शर्माने घडवला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी भारताची पहिलीच महिला क्रिकेटपटू

SCROLL FOR NEXT