Onion esakal
नाशिक

NAFED Onion Purchase : श्रीलंकेत उत्पादन अभावामुळे कांदा निर्यातीची संधी; कांदा भावात सुधारणा

सकाळ वृत्तसेवा

NAFED Onion Purchase : श्रीलंकेत ऑगस्टच्या मध्यापासून नवीन कांदा बाजारात येण्यास सुरवात होते. हा कांदा दोन ते तीन महिने टिकत असल्याने आयात शुल्क लावले जाते; पण यंदा श्रीलंकेतील आर्थिक अडचणींमुळे यंदा कांद्याची लागवड १० टक्के क्षेत्रावर झाल्याची माहिती आयातदारांकडून भारतीय निर्यातदारांपर्यंत पोचली आहे.

त्यामुळे स्वाभाविकपणे बांगलादेशच्या पाठोपाठ श्रीलंकेतील ग्राहकांना कांद्याची निर्यात करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. (Onion prices improve due to purchases for export with Nafed nashik news)

आयातदारांकडून श्रीलंका सरकारकडून कांद्यावर आयातशुल्क आकारले गेले, तरीही ते दोन ते तीन आठवड्यांपर्यंत तग धरू शकेल, अशा शक्यता भारतीय निर्यातदारांपर्यंत पोचली आहे. एवढेच नव्हे, तर पाकिस्तानचा कांदा आखाती देशांप्रमाणे मलेशियात जात असला, तरीही मलेशियातील आयातदारांनी पाकिस्तानचा कांदा २० टक्के घेत भारतीय कांद्याला ८० टक्के प्रतिसाद दिला आहे.

वाहतुकीचे कमी अंतर हे त्यामागील कारण असल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे. दरम्यान, कांद्याचे आगार असलेल्या भागात कांद्याच्या भावात दिवसेंदिवस सुधारणा होत चालली. आज मुंबईप्रमाणे मुंगसे (मालेगाव), पिंपळगाव बसवंतमध्ये एक हजार ४५० रुपये प्रतिक्विंटल असा सरासरी भाव शेतकऱ्यांना मिळाला आहे.

कोल्हापूरमध्ये एक हजार २००, पुण्यात एक हजार १५०, येवल्यात एक हजार २००, नाशिकमध्ये एक हजार ५०, लासलगावमध्ये एक हजार ३४०, सिन्नरमध्ये एक हजार १००, कळवणमध्ये एक हजार, चांदवडमध्ये एक हजार ३५०, सटाण्यात एक हजार २४०, देवळ्यात एक हजार २५० रुपये क्विंटल या सरासरी भावाने आज कांद्याची विक्री झाली. उन्हाळ कांद्याच्या भावात नेमकी कशामुळे वाढ होत आहे, याची माहिती व्यापाऱ्यांकडून घेतल्यावर ‘नाफेड'ची खरेदी सुरू असताना निर्यातीसाठी कांदा खरेदी केला जात असल्याचे कारण पुढे आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पाकिस्तानमध्ये यंदा कांद्याचे २० टक्क्यांनी अधिक उत्पादन आहे. हा कांदा प्रामुख्याने आखाती देशांमध्ये विक्रीसाठी पाठवला जातो. मात्र, तरीही पाकिस्तानच्या कांद्याच्या गुणवत्तेचा प्रश्‍न आयातदारांना जाणवत आहे. अशा स्थितीत आखाती देशातील आयातदारांकडून २० टक्के भारतीय कांदा विकत घेतला जातो.

याशिवाय, दक्षिणेत विशेषतः कर्नाटकमधील बेल्लारी पट्ट्यातून नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे. या कांद्याचा आकार छोटा असून, किलोला २८ ते २९ रुपयांपर्यंत भाव पोचला आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे निर्यातदारांकडून नाशिकच्या कांदा खरेदीला प्रतिसाद मिळतो.

अगोदर पावसाच्या बिघडलेल्या चक्रात कांद्याच्या गुणवत्तेच्या प्रश्‍नाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतावले आहे. परिणामी, विक्रीसाठी कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात येतो. ही सारी परिस्थिती पाहिल्यावर येत्या तीन ते चार आठवड्यांनंतर कांद्याच्या भावात आणखी सुधारणा होण्याची शक्यता बाजारपेठ अभ्यासकांकडून वर्तवली जात आहे.

कांद्याच्या निर्यातीचा भाव

(आकडे टनाला डॉलरमध्ये दर्शवतात)

० बांगलादेश- २९० ते ३००

० श्रीलंका- २९० ते ३००

० सिंगापूर- ३२०

० मलेशिया- २५०

० आखाती देश- ३२०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT