onion market.jpg 
नाशिक

निर्यातबंदी उठवल्याच्या अधिसूचनेअभावी कांदादरात घसरण...क्विंटलमागे एवढ्या रुपयांची घट!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : कांदा निर्यातबंदी उठविण्याच्या केंद्रीय ग्राहक संरक्षण-अन्न नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांच्या खूशखबरीची अधिसूचना जारी झालेली नाही. त्याचे थेट पडसाद बाजारपेठेवर उमटले आहेत. खूशखबरीच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता. 27) लासलगावला चारशे, तर पिंपळगावला तीनशे रुपयांनी भाव वाढले. मात्र, शुक्रवारी (ता. 28) जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये भावात क्विंटलला शंभर ते साडेतीनशे रुपयांनी घसरण झाली आहे. 

आणखी 24 ते 48 तासांची प्रतीक्षा करावी लागण्याचा अंदाज

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यावर सर्वसाधारणपणे 48 तासांमध्ये अधिसूचना जारी होते. मात्र, हा कालावधी उलटूनही अद्याप अधिसूचना जारी न झाल्याने जागतिक बाजारपेठेतील लांब पल्ल्याच्या धोरणासाठी धक्का मानला जात आहे. श्री. पासवान यांच्या मंत्रालयाने निर्यातबंदी उठविण्याची फाइल मार्गी लावली असून, वाणिज्य मंत्रालयाकडे त्यावर निर्णय बाकी आहे. त्यामुळे आणखी 24 ते 48 तासांची प्रतीक्षा करावी लागेल, असा कांदा निर्यातदारांचा अंदाज आहे. 

दिल्लीमध्ये 19 रुपये किलो 

देशांतर्गत कांद्याचे उत्पादन मुबलक असताना मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, पश्‍चिम बंगालमधील नवीन कांदा बाजारात येण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याचे भाव नियंत्रणात असल्याची साक्ष बाजारात विकल्या जाणाऱ्या कांद्याच्या भावावरून स्पष्ट होते. दिल्लीमध्ये घाऊक बाजारात 19 रुपये किलो भावाने कांदा विकला जात आहे. इतर बाजारपेठांत क्विंटलभर कांद्याचे शुक्रवारचे घाऊक सरासरी भाव रुपयांमध्ये असे : आग्रा- दोन हजार 170, भोपाळ- दोन हजार, चेन्नई- दोन हजार 700, हुबळी- एक हजार 350, मथुरा- दोन हजार, पाटणा- दोन हजार 400, सूरत- एक हजार 750. तसेच, मुंबईत दोन हजार, पुण्यात सतराशे, धुळ्यात एक हजार 800, जळगावमध्ये दीड हजार, कोल्हापूरमध्ये चौदाशे, राहतामध्ये सोळाशे, राहुरी मध्ये एक हजार 550, सोलापूरमध्ये बाराशे रुपये क्विंटल या सरासरी भावाने कांद्याची विक्री झाली. 


कांद्याच्या भावाची तुलनात्मक स्थिती (आकडे क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये)
 
बाजारपेठ शुक्रवारी (ता. 28) गुरुवारी (ता. 27) 
देवळा एक हजार 800, दोन हजार 100 
लासलगाव एक हजार 951, दोन हजार 150 
मनमाड एक हजार 700, एक हजार 800 
नामपूर एक हजार 800, एक हजार 900 
सटाणा एक हजार 825, दोन हजार 25 
येवला एक हजार 750, एक हजार 850 
पिंपळगाव एक हजार 851, दोन हजार 200 
उमराणे एक हजार 700, दोन हजार 50 
चांदवड एक हजार 750, एक हजार 900 
(कळवणमध्ये एक हजार 850 आणि मुंगसे व नाशिकमध्ये प्रत्येकी एक हजार 800 रुपये असा भाव राहिला.) 

कांदा निर्यातबंदीबाबत केंद्र सरकारने घातलेल्या घोळाचा निषेध करण्यात येत आहे. यापुढे कांदा निर्यात धोरण कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे असावे, यासाठी दबाव वाढविण्याकरिता म्हणून संघटनात्मक एक स्वतंत्र समिती नियुक्ती केली जाणार आहे. - भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff Announcement : डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी सहा देशांवर फोडला टेरिफ बॉम्ब; जाणून घ्या, आता कुणाचा नंबर लागला?

Liquor Shop Viral Video : दारूसाठी तडफड! ; दुकानाच्या खिडकीच्या ग्रिलमध्येच अडकलं दारूड्याचं डोकं अन् मग...

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

SCROLL FOR NEXT