Onion esakal
नाशिक

Onion Crisis : उष्णतेने साठवलेला कांदा लागला सडू; कवडीमोल भावात विकायची वेळ!

सकाळ वृत्तसेवा

विकास गिते : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : वाढत्या उष्णतेने कांदा सडू लागल्याने कांदा विकायचा, की तसाच ठेवायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

कांदा विक्रीसाठी पाठवला तर अपेक्षित बाजारभाव नाही आणि साठवून ठेवला तर सडण्याची भीती, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. (onion stored are stored rotting due to heat nashik news)

काही शेतकरी नाईलाजास्तव कांदा विक्रीसाठी पाठवू लागले आहेत. गेल्या हंगामात सिन्नर तालुक्यात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली होती. या वर्षी कांद्याचे उत्पादनही जास्त झाले. काढणीच्या वेळी बाजारभाव कोसळले.

त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा शेतामध्ये तर चाळीमध्ये साठवला. परंतु, वाढती उष्णता आणि अवकाळी पाऊस अशा संमिश्र वातावरणाने कांदा सडू लागला. कमी बाजारभावात कांदा विकायची वेळ शेतक-यांवर आली आहे.

कांदा काढण्याच्या अगोदर व कांदा काढणी सुरू असताना अनेकदा अवकाळी पाऊस झाला. परिणामी, कांदा सडू लागला आहे. दुसरीकडे कांद्याची लागवड, खत- औषधे, कीटकनाशक फवारणी तसेच मजुरी यासाठी एकरी ७२ हजार रुपयांच्या आसपास खर्च झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र, उत्पादन खर्च वजा होईल एवढाही बाजारात कांद्याला दर नाही. त्यातच आता साठवलेला कांदा सडू लागल्याने कांदा विकायचा, की तसाच ठेवायचा?

बाजारात कांदा पाठवला तर भाव कवडीमोल मिळणार आणि साठवून ठेवला तर तो सडून जाईल व हाती काहीच मिळणार नाही. अशा द्विधा मनःस्थितीत कांदा उत्पादक सापडले आहेत

"कांदा पिकासाठी मोठे भांडवल गुंतविले आहे. परंतु कांद्याला बाजारभाव कमी मिळत आहे. त्यातच अवकाळी पाऊस, वाढती उष्णता यामुळे कांदा लवकरच सडू लागल्याने मोठे नुकसान होत आहे. अधिक नुकसान टाळण्यासाठी कांदा विकण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आता मिळेल त्या बाजारभावात कांदा विक्री सुरू केली आहे." - गोवर्धन रानडे व ज्ञानेश्वर गडाख कांदा उत्पादक शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi Man Ki Baat : लग्नात काढला अख्ख्या गावाचा विमा, नांदेडच्या 'या' कुटुंबाचे पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मध्ये केले कौतुक

Ketan Agarwal Murder Case: "लग्न मोडण्यापेक्षा केतनला संपवणं सोपं वाटलं"; चौकशीतून सिया गोयलचा धक्कादायक खुलासा

ED Raid Former DIG : माजी डीआयजीकडे ५३ कोटींची संपत्ती; मुंबई, कोलकाता, आसाममध्ये ईडीचे छापे, गरीब पाहुण्याच्या नावावर कोट्यावधींची रक्कम

Sangli Crime: प्रियकराच्या मदतीने २२ वर्षीय पत्नीने झोपेतच पतीला संपवलं; आधी प्रेमविवाह, नंतर दुसऱ्यावर जडला जीव, आता बाळासोबत कोठडीत

'वर्षभरापासून वेगळे राहतोय...' गौरव खन्नाच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, 'आम्ही घटस्फोट घेतोय'

SCROLL FOR NEXT