nashik rain esakal
नाशिक

Nashik Rain Update : जिल्ह्यात 24 तासांत अवघा 5 मिलिमीटर पाऊस

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain Update : महिन्याभराच्या विश्रांतीनंतर आगमन झालेल्या पावसामुळे गोदावरीला पहिला पूर आलेला असताना पावसाने पुन्हा दडी मारली आहे.

गेल्या २४ तासांत अवघे पाच मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणामधून होणारा विसर्ग घटविण्यात आला आहे. (Only 5 millimeters of rain in district in 24 hours nashik news)

ऑगस्टमध्येच पावसाची खरी गरज होती. मात्र, हा महिना पूर्णत: कोरडा गेल्याने आता सप्टेंबरमध्ये पावसाचे आगमन झाले. गुरुवारी (ता. ७) सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेअकरापर्यंत १० मिलिमीटर पाऊस पडला.

शुक्रवारी (ता. ८) सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाचपर्यंत ६२ मिलिमीटर पाऊस पडल्याचे हवामान विभागाने सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्याचा भात व नागली या पिकांना निश्चितपणे फायदा झाला. मात्र, पावसाचे प्रमाण कायम राहील, अशी अपेक्षा फोल ठरली आहे.

गेल्या २४ तासांमध्ये पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे. नांदगाव, चांदवड, येवला, मनमाड, मालेगाव, सिन्नर, निफाड या तालुक्यांमध्ये आजही पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे धरणे ओव्हरफ्लो दिसत असली तरी पाण्याची चिंता अद्याप मिटलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT