Open Rohitra on Chinchkhed Road. esakal
नाशिक

Nashik News : पिंपळगाव शहरातील उघडे रोहित्र ठरतायेत डेझर्ट झोन!

शहरात अनेक ठिकाणचे विद्युत रोहित्र उघडे पडले आहेत. रोहित्रांना दरवाजे नसल्याने वीजतारांचे जाळे उघड्यावर आहे.

एस. डी. आहिरे

पिंपळगाव बसवंत : शहरात अनेक ठिकाणचे विद्युत रोहित्र उघडे पडले आहेत. रोहित्रांना दरवाजे नसल्याने वीजतारांचे जाळे उघड्यावर आहे. उघड्या तारांना एखाद्या व्यक्तीचा अनवधानाने स्पर्श झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रोहित्रांना दरवाजा लावणे, देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी वीज कंपनीवर आहे. मात्र, याविषयी कुठलेही गांभीर्य दिसत नसून, डेंजर झोन ठरणारी रोहित्रांची स्थिती शहरात ‘जैसे थे’च दिसून येत आहे. (Open spaces transformers in Pimpalgaon city becoming desert zone Nashik News)

महावितरण’च्या मुख्य केंद्रातून येणारा वीजप्रवाह अतिउच्च दाबाचा असतो. तो थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवला जात नाही. ग्राहक आणि उच्च दाब यांच्यातील मुख्य दुवा म्हणजे रोहित्र. या रोहित्रांची योग्य देखरेखीचे काम ‘महावितरण’कडे असते.

मात्र, देखरेख केली जात नाही. पिंपळगाव शहरात उपनगरांमध्ये रोहित्र आहेत. यातील बहुतांश रोहित्र रस्त्याच्या बाजूलाच आहेत. अनेक रोहित्रांना संरक्षक जाळी अथवा गेट नाही. जवळपास झाड्यांच्या फांद्या असल्याने आग लागण्याचा धोकाही आहे.

मात्र, याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात असल्याचे एकंदरित चित्रावरून दिसून येत आहे. ‘महावितरण’कडून शहरात रोहित्र बसविले आहेत. मात्र, त्याभोवती आवश्यक सुरक्षा कवच मात्र बसविले नाही.

कित्येक ठिकाणी बसविलेल्या रोहित्रसमोर धोका फलकही लावण्यात आले नाहीत. रस्त्यावरील वीजखांबालगत धोकादायक वायरिंग, उघड्या डीपी, तसेच पथदीपांच्या खांबावर सर्रासपणे जाहिरातींच्या होर्डिंग लावण्यात आल्याचेही दिसून येते.

त्याकडेही संबंधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे कोणाचा तरी जीव घेतल्यावरच संबंधित विभागाला जाग येईल का, असा प्रश्न शहरवासीयांकडून उपस्थित केला जात आहे.

सूचनांची लागली वाट

विद्युत रोहित्रांवर ‘डेंजर’ (धोका) असे लिहिलेले असते. खतऱ्याची सूचना सचित्र सूचना देण्यात येते. उघडे रोहित्र अपघातांना आमंत्रण देऊ शकते. रोहित्रांवरील सूचनांची पूर्णतः वाट लावली आहे.

अनेक ठिकाणच्या रोहित्रांवर विविध प्रकारच्या जाहिरातीचे फलक चिकटविण्यात येतात. रोहित्राजवळ परिसरातील कोणीही किरकोळ सामान ठेवतात. एवढेच नव्हे, तर रोहित्राजवळ नकळत वाहन लावणे, गुरांना बाधणे, असे प्रकार सर्रास शहरात दिसतात.

अधिकारी, कर्मचारी करतात दुर्लक्ष

‘महावितरण’च्या विद्युत रोहित्रातील डीपी बऱ्याच दिवसांपासून उघडे आहेत. एखाद्या लहान बालकाचा हात सहजरित्या या डीपीपर्यंत पोहोचू शकतो. समस्या सांगूनही महावितरणचे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

शहरात ज्या-ज्या ठिकाणी उघडे रोहित्र असणार, त्या ठिकाणाची तपासणी करून बंदिस्त करण्याच्या सूचना देणार असल्याचे ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT