chhagan bhujbal.jpg 
नाशिक

''अन्नसुरक्षेत नसलेल्या केशरी कार्डधारकांना लवकरच सवलतीच्या दरात धान्यवाटप करावे''

सकाळवृत्तसेवा

नाशिक : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या 71 लाख 54 हजार 738 केशरी कार्डधारकांना मे आणि जून या दोन महिन्यांचे सवलतीच्या दराने धान्याचे वाटप करावे, असे आदेश बुधवारी (ता. 22) अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील पुरवठा अधिकाऱ्यांना दिले आहे. धान्याचा लाभ तीन कोटी आठ लाख 44 हजार 76 नागरिकांना मिळणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद 

नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून श्री. भुजबळ यांनी राज्यातील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. सचिव संजय खंदारे, शिधापत्रिका नियंत्रक कैलास पगारे, सहसचिव सतीश सुपे आदी उपस्थित होते. केशरी कार्डधारकांना 92 हजार 532 टन गहू, 61 हजार 688 टन तांदूळ दिला जाणार आहे, असे सांगून श्री. भुजबळ म्हणाले, की आठ रुपये किलो गहू, 12 रुपये किलो तांदूळ या दराने प्रत्येक व्यक्तीला महिन्याला तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ दिला जाईल. कार्डधारकांच्या नोंदी संगणकीय प्रणालीवर झाल्या नसतील अथवा आधार सीडिंग झाले नसेल, तरी सरकारच्या निर्णयानुसार ठरवलेल्या दराने व परिमाणात अन्नधान्य देण्यात यावे. अन्नधान्य वाटप करताना रेशन दुकानदाराने त्या कार्डाचा क्रमांक, त्यावरील पात्र सदस्यांची संख्या व कार्डवरील इतर संपूर्ण तपशील याबाबतची नोंद स्वतंत्र नोंदवहीमध्ये ठेवावी. त्या नोंदवहीमध्ये अन्नधान्य घ्यावयास आलेल्या सदस्याची स्वाक्षरी अथवा डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा घेऊन ग्राहकास रीतसर पावती देण्यात यावी. अन्नधान्याच्या वाटपामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. तसेच रेशन दुकानदारास लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील देय असलेले "मार्जिन' या अन्नधान्याच्या वितरणासाठी देण्यात यावे, अशा सूचना दिल्या. 

बचत झालेल्या 5 टक्के धान्यवाटपास परवानगी द्या 

लॉकडाउनमध्ये स्थलांतरित बेघर कामगार, मजूर, गरीब व गरजू राज्यात विविध जिल्ह्यांत अडकून पडले आहेत. त्यांच्याकडे रेशनकार्ड नसल्याने त्यांना अन्नधान्य देण्याची कुठली योजना नसल्याने त्यांना अन्नधान्याचे वाटप झाल्यानंतर बचत झालेले 5 टक्के धान्य सवलतीच्या दरात देण्याची परवानगी मिळावी. श्री. भुजबळ यांनी ही मागणी केंद्रीय अन्नपुरवठामंत्री रामविलास पासवान यांच्याकडे पत्राद्वारे केली. श्री. भुजबळ यांनी हीच मागणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये श्री. पासवान यांच्याकडे केली होती.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT