The Pingat brothers take the Shama horse to Jejuri and fulfill their vows.  esakal
नाशिक

Nashik News : ‘शामा’ला खंडोबाच्या चरणी नेत नवसपूर्ती; पानेवाडीचे पिंगट बंधून अश्‍वासह जेजुरीत

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : बैलगाडा शर्यतीवरील बंदी न्यायालयाने उठवल्यानंतर शौकिनांकडून आनंद व्यक्त होत आहे.

ही बंदी उठल्यानंतर पानेवाडीच्या (ता.नांदगाव) पिंगट बंधूंनी तर आपल्या लाडक्या 'शामा' घोड्याला थेट जेजुरीला खंडोबाच्या चरणी नेऊन आपली नवसपूर्ती करत भंडाऱ्याची उधळण केली. (pingat brother fulfill vow by taking horse directly to Jejuri Khandoba feet nashik news)

शर्यतीसाठी धावणारी बैल, घोडे यांना जिवापाड जपले जाते. त्यांची पोटच्या मुलाप्रमाणे काळजी घेतली जाते. हा नादच खुळा असल्यामुळे त्याला जपण्यासाठी काहीपण केले जाते. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली होती.

शर्यतीवरील बंदी उठावी यासाठी पानेवाडीच्या पिंगट बंधू यांनी जेजुरीच्या खंडोबाला नवस केला होता. प्राणीमित्रांनी दाखल केलेल्या याचिकेबाबत शेतकऱ्यांनी आपण बैलांना किती आपुलकीने, प्रेमाने जपतो हे पटवून दिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचा पारंपारिक खेळ असलेल्या बैलगाडा शर्यतीवरील बंदीला उठवले आहे.

शर्यतीवरील बंदी उठल्याने पिंगट बंधू आणि मित्र परिवाराने शामा घोड्याला गाडीत घालून जेजुरीचा रस्ता धरला.जेजुरीला गेल्यानंतर गडाला असलेल्या सर्व पायऱ्या चढून घोडा गडावर चढला. खंडोबाच्या मंदिराजवळ जाताच सर्वांनीच एकच जल्लोष केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

' येळकोट येळकोट जयमल्हार' च्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. मंदिरावर आणि घोड्यावर भंडाऱ्याची उधळण करत जेजुरीला खंडोबाच्या चरणी नतमस्तक होत आपली नवसपूर्ती केली.

शामा घोडा हा टांगा शर्यतीत धावण्यात पुढे असतो. टांगा शर्यतसाठी पिंगट बंधू यांनी जीवापाड जपलेली खोंड आणि घोड्याला खुराक सुरु केला आहे. टांगा शर्यतीत धावणाऱ्या शामावर पिंगट बंधूंनी पोटच्या मुलाप्रमाणे जीव लावला आहे. टांगा शर्यतीत सर्वात पुढे असलेला शामा हा पंचक्रोशीत होणाऱ्या लग्न सोहळ्यात देखील नृत्य आविष्काराने सर्वांची मने जिंकत असतो.

"बैलगाडा शर्यत हा शेतकऱ्यांचा आवडीचा विषय आहे. मात्र यावर कोर्टाची बंदी असल्यामुळे अनेक वर्षापासून शर्यत बंद होती. मात्र कोर्टाने ही बंदी उठवल्यामुळे बैलगाडा शौकिनांसह शेतकऱ्यांना मोठा आनंद झाला. त्यामुळे नवस केला होता की निकाल लागल्यानंतर आमच्या घोड्याला जेजुरीला खंडोबाच्या दर्शनाला घेऊन जाईल. त्याप्रमाणे जेजुरीला जाऊन आम्ही नवसपूर्ती केली." - महेश पिंगट, गणेश पिंगट टांगा शर्यत शौकीन, पानेवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Boat Accident : समुद्रात बोट बुडाली! बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, थरारक व्हिडीओ व्हायरल, अनेकजण बुडाले

Maharashtra Latest News Update: हिंजवडी परिसरातील आयटी कंपनीतील 82 कोटी रुपयांच्या डेटाची चोरी

Beed : सरकारी वकिलानं कोर्टातच संपवलं आयुष्य, सत्काराच्या शालने घेतला गळफास; बीडमध्ये खळबळ

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

SCROLL FOR NEXT