Pothles on road latest rain update news  esakal
नाशिक

रस्त्यांचे पितळ उघडे; पावसाने पडले खड्डे अन् रस्त्यावर पसरली खडी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : प्रत्येक विभागात दोन याप्रमाणे बारा रस्ते मॉडेल म्हणून विकसित करण्यासाठी महापालिका आयुक्त रमेश पवार (NMC Commissioner Ramesh Pawar) यांनी मनोदय व्यक्त केला आहे. असे असताना दुसरीकडे पावसात (Rain) बांधकाम विभागाच्या कामाच्या गुणवत्तेचे पितळ उघडे पडताना दिसत आहे.

रस्त्यांवर जागोजागी खड्डे (Potholes) पडत असून, नव्याने तयार केलेले रस्ते उखडले जात आहे. अनेक भागात रस्त्यावरील वरचा थर बाजूला पडत असल्याने खडीवर वाहने घसरून वाहनधारक जखमी होत आहेत. (Pits due to heavy rain and stones spread on road Nashik Latest Rain update news)

महापालिकेकडून दरवर्षी रस्त्यांवर करोडो रुपये खर्च केले जातात. मागील आर्थिक वर्षात अडीचशे कोटींहून अधिक रक्कम रस्त्यांवर खर्च झाली. दरवर्षी खर्च होत असला तरी रस्त्यांची गुणवत्ता मात्र सुधारत नाही.

दोन दिवसांच्या पावसामुळे रस्त्यांच्या गुणवत्तेचे पितळ उघडे पडले आहे. पंचवटी विभागात पेठ रोड सिग्नल ते तवली फाटा या दरम्यान रस्त्याची चाळणी झाली. हा भाग भाजपच्या सत्ताकाळात महापौर राहिलेल्या रंजना भानसी व दोनदा स्थायी समिती सभापती राहिलेल्या गणेश गिते यांच्या प्रभागात येतो. अरुण पवार हे भाजपचे गटनेतेदेखील होते.

सलग पाच वर्षे शिवसेनेचे गटनेते राहिलेल्या विलास शिंदे यांच्या जेहान सर्कल भागात मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. गोविंदनगर भागात रस्ता खचण्याचे प्रकार झाला, तर पूर्व विभागात टाकळी गाव, टाकळी रोड, तसेच गोदावरी नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांना डोंगराचे स्वरूप आले आहे.

नव्याने तयार झालेल्या रस्त्यांवरील डांबर निघून खडी बाहेर पडल्याने रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT