crime  esakal
नाशिक

Nashik Crime News : एकलव्य निवासी शाळेत विद्यार्थिनींशी गैरवर्तनप्रकरणी पोलिसांची भूमिका

जिल्ह्यातील एकलव्य निवासी शाळेतील शिक्षक व वसतीगृह अधिक्षकांच्या गैरप्रकाराची महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतल्यानंतर पोलिसांनी संबंधित शाळेत जाऊन विद्यार्थिनींसोबत संवाद साधला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : आदिवासी विकास विभागाकडून जिल्ह्यातील एकलव्य निवासी शाळेतील शिक्षक व वसतीगृह अधिक्षकांच्या गैरप्रकाराची महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतल्यानंतर पोलिसांनी संबंधित शाळेत जाऊन विद्यार्थिनींसोबत संवाद साधला.

यावेळी पोलिसांनी घटनाक्रम जाणून घेतला. (Police action in case of misbehavior with female students in Eklavya Residential School nashik crime)

पीडित विद्यार्थिनी अल्पवयीन असल्याने पालकांच्या तक्रारीनंतरच पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करता येईल, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे.

आदिवासी विभागाच्या एकलव्य निवासी शाळेच्या शिक्षकानेच विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचा गंभीर प्रकार नुकताच उघड झाला. या प्रकारानंतर, आदिवासी आयुक्तालयाने संशयित शिक्षक विनोद कहारवर निलंबनाची कारवाई केली.

तर प्राचार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अधीक्षिका स्वाती पगार यांची नियुक्ती रद्द केली आहे. राज्य बालहक्क आयोगाने याची दखल घेत आदिवासी आयुक्तालयाकडे अहवाल मागविला आहे.

या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास दोषींवरील कारवाईस टाळाटाळ होत असल्याची तक्रार राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडे करण्याचा इशारा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने दिला आहे.

पोलिसांचा पीडितांशी संवाद

विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करून तत्काळ गुन्हे दाखल करण्याच्या सूचना पोलिस प्रशासनाला केल्या आहेत. या पत्रानंतर, पोलिसांनी शाळेत जाऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली.

संबंधित विद्यार्थिनींशी संवादही साधला. मात्र, पालकांनी याबाबत तक्रार करावी, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे गुन्हा नेमका कधी दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

Pune Crime: उरुळी कांचनमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; सहा दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT