police
police esakal
नाशिक

Nashik Crime : गुन्हेगारांविरोधात पोलिस आयुक्त आक्रमक; धडक कारवाईच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी धडक कारवाईचे आदेश पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत.

त्यानुसार गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारी टोळ्यांविरोधात मोक्काअन्वये कारवाई करतानाच, सराईत गुन्हेगारांची धरपकड करून त्यांच्यावर थेट स्थानबद्धतेची कारवाई करीत मध्यवर्ती कारागृहात भरती करण्यात येत आहे. (Police Commissioner Ankush Shinde has ordered the police officers to take drastic action to stop increasing crime nashik news)

तसेच, पोलिस ठाणेनिहाय सराईत गुन्हेगारांविरोधात तडीपारीचे प्रस्ताव मागविण्यात येऊन त्यावर जलदगतीने कारवाईही केली जात असून, आत्तापर्यंत ४३ गुन्हेगारांविरोधात तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. तर, काही राजकीय वरदहस्त असलेल्या गुन्हेगारांचीही माहिती संकलित केली जात असून, लवकरच त्यांच्याविरोधातही कडक कारवाई केली जाणार आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये शहर आयुक्तालय हद्दीमध्ये गुन्हेगारांची डोके वर काढले होते. चोऱ्या, जबरी चोऱ्या, घरफोड्यांसह प्राणघातक हल्ले अन्‌ मारहाणीच्या घटना सातत्याने घडत होत्या. त्यातच, पंचवटी आणि सातपूर औद्योगिक वसाहतीत गोळीबारीच्या घटनांनी शहर हादरले तर, सिडकोत गुंडांचे टोळीयुद्ध भडकले.

त्यातून भरदिवसा राजकीय पदाधिकारी व सराईत गुन्हेगारावर गोळीबार करीत प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. कोरोनाच्या प्रादूर्भावाखाली शांत असलेल्या नाशिकमध्ये अचानक सराईत गुन्हेगारांनी डोके वर काढल्याने शहर पोलिसांवर टीकेची झोड उठली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आयुक्तालय हद्दीत रात्रीचे कोम्बिंग ऑपरेशन राबवितानाच नाकाबंदीसह गुन्हेगारांविरोधात धडक कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून शहरात रात्रीच्या कोम्बिंगसह दिवसाही नाकाबंदी करीत कोम्बिंग ऑपरेशन राबविले जात आहेत.

तर, पोलिस ठाणे निहाय सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित करून तातडीने गुन्हेगारी टोळ्यांविरोधात मोक्काअन्वये प्रस्ताव करून कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार पंचवटीतील फुलेनगरमध्ये गोळीबार करून दहशत पसरविणारी टोळी, सातपूर औद्योगिक वसाहतीतील गोळीबार प्रकारातील संशयितांविरोधात आणि सिडकोत राकेश कोष्टीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या जया दिवे व टोळीविरोधात मोक्काअन्वये कारवाई करण्यात आलेली आहे.

पोलिस आयुक्तांच्या या कारवाईने शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे काही टोळ्यांनी शहरातून काढता पाय घेतला असला तरी आयुक्तांच्या आदेशान्वये तडीपारींनंतरही गुन्हेगारी कारवाया करीत असलेल्या सराईत गुन्हेगारांविरोधात स्थानबद्धतेची कारवाई करीत, त्यांना ताब्यात घेत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात जमा केले आहे.

गंभीर गुन्हे दाखल असल्यास तडीपारी

दोनपेक्षा अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती पोलिस ठाणेनिहाय संकलित करण्यात आली आहे. त्यानुसार, आयुक्तालयाकडे ७१ प्रस्ताव आले असता, त्यापैकी ४३ सराईत गुन्हेगारांना शहर-जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेले आहेत. तर, अद्यापही ६३ प्रस्तावांनुसार शहर पोलिसांची कारवाई सुरू आहेत. आयुक्तांच्या या धडक कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.

आयुक्तालयातील तडीपारी

मे अखेर प्रस्ताव तडीपार प्रलंबित प्रस्ताव ७१ ४३ ६३

"शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांविरोधात मोक्का, स्थानबद्धता व तडीपारीची कारवाई केली जात आहे. यामुळे गुन्हेगारीला आळा बसला आहे. या कारवाया यापुढेही सुरू राहतील. जेणेकरून शहरात गुन्हेगारी फोफावणार नाही, यासाठी कठोर उपाययोजना सुरू आहेत." - प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, शहर गुन्हेशाखा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drunk Driving Accident: कल्याणीनगरच्या आपघात प्रकरणी थातूरमातूर कारवाई? पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Iran President Helicopter Crash : इब्राहिम रईस यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत खामेनींच्या मुलाचा हात? इराणमध्ये सत्तासंघर्ष पेटणार, जाणून घ्या सविस्तर

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

SCROLL FOR NEXT