Rice farming
Rice farming Sakal
नाशिक

Nashik Agriculture News : भात रोपांसाठी दुबार पेरणीचे संकट; शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आकाशाकडे

सकाळ वृत्तसेवा

Nashik Agriculture News : भाताचे कोठार आणि पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यावर वरुणराजा रुसला आहे. त्यामुळे जवळपास २७ हजार हेक्टरवर भात लागवडीला उशीर होण्याची शक्यता आहे. (possibility of delay in rice cultivation on 27 thousand hectares due to delay in rain nashik news)

जून महिन्याच्या सुरवातीपासून अवकाळी पावसाने काही प्रमाणात हजेरी लावल्याने तालुक्यात पूर्व व पश्‍चिम भागात तुरळक ठिकाणी भात रोपांची पेरणी करण्यात आली होती. मात्र पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्यामुळे भाताच्या रोपांची पेरणी केलेल्यांचे मात्र धाबे दणाणले आहे. यामुळे तालुक्यातील बळिराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी न लावल्याने बळिराजा हवालदिल झाला असून शेतातील नांगरणी, कुळवणी, जमीन सपाटीकरण, बांधबंदिस्ती आदी मशागतीची कामांना उशीर होत आहे. मॉन्सून जवळ आल्याने शेतातील कामे करण्यासाठी बैलजोडी बरोबरच ट्रॅक्टरचा वापर केला जात आहे.

तालुक्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस दमदार हजेरी लावत असतो. मात्र यावर्षी पाहिजे तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट येण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. काहीही असले तरी या महिन्यात वेळेवर पाऊस झाला तर तालुक्यात भाताचे उत्पादन चांगले होऊ शकते अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कमी दिवसाच्या वाणांना प्राधान्य

इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक लागवड असलेल्या भातपिकांमध्ये जयश्री राम आणि ॐ श्रीराम सुधारित भात बियाणे मोठ्या प्रमाणात लागवड केले जाते. इंद्रायणी, गरी, आर चोवीस यांची लागवड कमी होण्याची शक्यता आहे. कारण ही पिके येण्यास जवळपास ११० ते १४० दिवस लागतात. हळी भात येण्यास ९० ते ११० दिवस लागतात. त्यामुळे या जातीचे भात मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आह़े

"पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी तालुक्यात भात शेती अत्यंत बेभरवशाची झाली आहे. मोठ्या प्रमाणात गरी भात पिके घेण्यात तालुका अग्रेसर होता, मात्र पावसाचे अत्यल्प प्रमाण बघता कमी दिवसांच्या भात रोपांकडे आम्ही वळत आहोत." - संदीप बोंबले, शेतकरी

असे आहे यंदाच्या खरिपाचे नियोजन

(पीक व लागवडीचे उद्दिष्ट्य क्षेत्र हेक्टरमध्ये)

भात : २९ हजार २०० हेक्टर

नागली : ७८० हेक्टर

वरई : ८०० हेक्टर

मका : २३२ हेक्टर

भुईमूग : ३८६ हेक्टर

सोयाबीन : ९३८ हेक्टर

खुरासनी : ५१८ हेक्टर

मुग : ४०८ हेक्टर

तूर : ८० हेक्टर

उडिद : ६६ हेक्टर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

ICMR On Side Effects Of Covaxin: Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट; ICMR ने अहवालावर उपस्थित प्रश्न केले

SCROLL FOR NEXT