pregnancy-.jpg 
नाशिक

#Coronavirus : गरोदर महिलांनो चिंता करु नका..."ग्रोथ स्कॅन'द्वारे ठेवा लक्ष 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना विषाणूच्या संसर्गाने संपूर्ण कुटुंब आरोग्याच्या बाबतीत सतर्क झाले आहे. यात दहा वर्षांचे बाळ, गरोदर महिला, ज्येष्ठ अशांच्या बाबतीत अधिकच चिंता लागली आहे. या चिंतेतून मुक्तता मिळावी, नेमकी काय काळजी घ्यावी, यासाठी विविध तज्ज्ञांचे आरोग्यासंदर्भातील हे सदर... 

उपचार करणे सोनोग्राफीमुळे सोपे

गर्भधारणा झाल्यापासून बाळाचा जन्म होईपर्यंत त्याची वाढ, हालचाल हे विलक्षण पाहणे सोनोग्राफीमुळे शक्‍य झालंय. गर्भाची वाढ, व्यंगाचे अचूक निदान बाळ जन्माला येण्यापूर्वी करता येते. त्याचप्रमाणे स्त्रीरोगांवर निदान व उपचार करणे सोनोग्राफीमुळे सोपे झाले आहे. गरोदरपणाच्या नऊ महिन्यांच्या काळात तीन ते चार वेळा सोनोग्राफी केली जाते. गरजेप्रमाणे अधिक वेळा सोनोग्राफी करावी लागते. दुसऱ्या सोनोग्राफीत बाळातील जवळपास 80 ते 85 आजार समजण्यास मदत होते. 

"ग्रोथ स्कॅन'द्वारे ठेवले जातेय लक्ष 
गर्भवतीची सोनोग्राफी ही बाब इतर चाचण्यांबरोबरचा एक नेहमीचा भाग आहे. ज्या स्त्रियांमध्ये गर्भपात होण्याची भीती असते अथवा होतो, त्यांच्यावरील उपचारांमध्ये सोनोग्राफीचा उपयोग केला जातो. पहिली सोनोग्राफी दीड ते दोन महिन्यांत (सहा ते आठ आठवडे) करतात. त्यामध्ये गर्भधारणा आहे की नाही, हे निश्‍चित केले जाते. गर्भधारणा असल्यास ती किती आठवड्यांची आहे, हे बघितले जाते. दुसरी सोनोग्राफी तीन ते चार महिन्यांत (11 ते 14 आठवडे) करतात. त्याद्वारे आपल्याला गर्भ थोडासा आकारात दिसतो. बाळाच्या विविध आजारांची एक प्राथमिक तपासणी व निदान सोनोग्राफीद्वारे करता येते. तिसरी सोनोग्राफी चौथ्या ते पाचव्या महिन्यांत (18 ते 22 आठवडे) केली जाते. ही सोनोग्राफी "टार्गेटेड' सोनोग्राफी म्हणून ओळखली जाते. त्यामध्ये गर्भाचे डोके, पाठ, पोट, हृदय, हातपाय, चेहरा यांची व्यवस्थित तपासणी केली जाते. चौथी सोनोग्राफी सात ते आठ महिन्यांत (21 ते 32 आठवडे) करतात. त्यालाच "ग्रोथ स्कॅन' असेही म्हणतात. त्यात बाळाची वाढ, गर्भजलाची पातळी, बाळाचे वजन, बाळातील जन्मदोष अशा बऱ्याच बाबींकडे लक्ष दिले जाते. 

VIDEO : Breaking : नाशिकमध्ये दुसरा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह...जिल्हाधिकारीं कडून माहिती

गेल्या काही वर्षांत सोनोग्राफीच्या तंत्रज्ञानात अनेक बदल झाले आहेत. सध्या थ्रीडी आणि फोर-डी असे प्रकार आहेत. सोनोग्राफी करणे पूर्णपणे हितकारक असल्याने प्रत्येक गर्भवतीच्या किमान चार सोनोग्राफी केल्या जातात. - डॉ. निवेदिता पवार, स्त्रीरोगतज्ज्ञ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'IPL 2026 मध्ये बांगलादेशी क्रिकेटपटूंना खेळवाल तर...', शिवसेनेकडून धमकी

DU Recruitment: दिल्ली विद्यापीठात टीचिंग आणि नॉन-टीचिंग पदांसाठी भरती जाहीर; 2.18 लाखपर्यंत पगार; आजच करा अर्ज

Latest Marathi News Live Update : - छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या समर्थकांच्या भाजपविरोात घोषणा अन् युती तोडण्याची मागणी

Thane Politics: “माझी हकालपट्टी करा!”; शिंदेंच्या होमग्राऊंडवरच अस्वस्थता, कैलास शिंदेंच्या पत्राने खळबळ

Dhule Jal Jeevan Mission : धुळ्यात 'जल जीवन मिशन'ची गती मंदावली; २०२५ संपले तरी ५२ टक्के कामे कागदावरच!

SCROLL FOR NEXT