Rabi's corn is in full swing right now.
Rabi's corn is in full swing right now. esakal
नाशिक

Nashik News : खासगी बाजारात शेतमालाला हमीभावापेक्षा अधिक दर; उत्पादन व मागणीचा असमतोल

संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : मागणी तसा पुरवठा हा अर्थशास्त्राचा नियम आहे पण मागणी इतका पुरवठा न झाल्यास नक्कीच बाजारभावावर परिणाम होतो. चालूवर्षी अतिरिक्त पाऊस पडल्याने शेतपिकाच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. परिणामी मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याने सध्या बाजारात शेतमालाच्या भावाची तेजी आहे. प्रथमच हमीभावापेक्षा खासगी बाजारात शेतमालाला अधिकचा दर मिळत असून शेतकऱ्यांच्या पदरात त्याच्या कष्टाचे मोल पडत आहे. (Price of agricultural produce higher than guaranteed price in private market Imbalance of production and demand Nashik News)

केंद्र शासनाकडून दरवर्षी पिकांना हमीभाव जाहीर होतो. मात्र हमीभावाने शेतमाल खरेदीची व्यवस्थाच नसल्याने शेतकऱ्यांना खासगी बाजाराची वाट धरावी लागते. त्यातच दरवर्षीच हमीभावाच्या तुलनेत खासगी बाजारात शेतमालाला कमी भाव मिळतो अन हमीभावाने जी खरेदी होते.

पण ती नाममात्र स्वरूपात असल्याने शेतकऱ्यांना खासगीच बाजाराचा रस्ता धरावा लागतो. विशेष म्हणजे खासगी बाजारात तब्बल ५०० ते दोन हजारापर्यंत कमी दराने शेतमाल शेतकऱ्यांना विकण्याची वेळ मागील दोन-तीन वर्षात आलेली आहे.

जिल्ह्याचा विचार केल्यास भात, ज्वारी, बाजरी, मका या प्रमुख पिकांची हमीभावाने खरेदी होते. तर अधूनमधून तूर व मुगाची खरेदी केली जाते. मात्र या खरेदीसाठी क्विंटलची मर्यादा ठरवून दिले जाते. परिणामी निम्म्याहून शेतकरी हमीभावाच्या लाभापासून वंचित राहतात.

मागील दोन-तीन वर्षात जिल्ह्यातील मकाचे क्षेत्र वाढल्याने जिल्ह्यातील आठ केंद्रावर हमीभावाने खरेदी होते. यासाठी जिल्ह्यातील सात ते नऊ हजार शेतकरी नाव नोंदणी करतात. प्रत्यक्षात तीन ते चार हजार शेतकऱ्यांची मका खरेदी होते. परिणामी उर्वरित शेतकऱ्यांना खासगी बाजाराची वाट धरावी लागते.

मकाच्या भावाचा विक्रम

दरवर्षी हमीभावाच्या तुलनेत नाकाला खासगी बाजारात २०० ते ५०० रुपये कमी दर असतो. त्यामुळे हमीभावाच्या विक्रीसाठी जिल्ह्यातील आठ केंद्रावर रस्सीखेच लागते. या वर्षी मात्र उलटे चित्र असून पोल्ट्री व स्टार्च उद्योगाला मकाची मोठी मागणी वाढली आहे. यामुळे मागील वर्षी आजच्या दिवशी मकाला १ हजार ७६० रुपयाचा प्रतिक्विंटलला दर होता तोच या वर्षी २ हजार १८१ रुपयाचा दर मिळतोय. त्यामुळे मका हक्काचे पीक

म्हणून शेतकऱ्यांना दोन रुपयाचा लाभ देत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात तब्बल दोन लाख ३६ हजार हेक्टरवर यंदा माकाचे पीक घेतल्याने नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. कपाशी, सोयाबीनची देखील हीच परिस्थिती असल्याने बाजारभावात तेजी आहे. खासगी बाजारातील तेजीमुळे यंदा जिल्हा मार्केटिंग फेडरेशन मार्फत एकाही केंद्रावर कुठल्याच शेतमालाची हमीभावाने खरेदी सुरू होऊ शकलेली नाही.

मागील वर्षीपेक्षा भावात तेजी

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सर्वच पिकांचे बाजारभाव तेजीत आहे. मागील वर्षी कांद्याला आजच्या घडीला २ हजार २४४ रुपयांचा क्विंटलला भाव मिळत होता. तोच यंदा १ हजार ९८० रुपये आहे.

गव्हाचा दर २ हजार १५० रुपये होता तो यंदा ३०० रुपये झाला असून सोयाबीनचा दर मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कमी आहे. मागील वर्षी सोयाबीनला ६ हजार ३३२ रुपयांचा दर होता तोच या वर्षी ५ हजार ३०० रुपये आहे. हरभरा मागील वर्षी ५ हजार २०० तर या वर्षी ५ हजार ३०० रुपये दर मिळत आहे.

अतिवृष्टीने वाढले भाव

यावर्षी खरीप हंगामात सुरवातीला पावसाने खंड पडला तर नंतर सर्वत्र ढगफुटी सदृश पाऊस होऊन पिकांची वाट लावली. परिणामी उत्पादनात मोठी घट झाली आहे. सध्या बाजारात येणाऱ्या आवकेचे प्रमाणही मर्यादित असल्याने त्याचा फायदा बाजार भावाला होत आहे. मका, सोयाबीनसह सर्वच पिकाच्या उत्पादनात २५ ते ३० टक्के पर्यंत घट झाल्याने बाजाराला मागणी इतका पुरवठा होत नसल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

अशी आहे भावातील तफावत

पिक - जाहीर हमीभाव मिळणारा बाजारभाव

ज्वारी २०४० ते २९७० ४००० ते ५५००

बाजरी २३५० २०९०

मका १९६२ २१८१

तूर ६६०० ६००१

मूग ७७५५ ८९०१

गहू २०१५ ३०५०

सोयाबीन ४३०० ५५५१

कपाशी ६०८० ८००० ते ९०००

भुईमूग ५८५० ५६००

भात २०६० २४००

सूर्यफूल ६४०० ६०००

हरभरा ५२३० ५०००

"या वर्षी अतिपावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे एकरी उत्पन्नात मोठी घट झाली आहे. एकट्या तालुक्यात आठ हजार हेक्टरवर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वत्रच झालेल्या नुकसानीमुळेच उत्पादन घटल्याने मागणीत वाढ होत असल्याने बाजारातील भावावर परिणाम दिसत आहे. त्यामुळे खूप दर मिळतोय." - हितेंद्र पगारे, कृषी अधिकारी,येवला

"येवला, नांदगाव, मालेगाव पट्टा मकाचे आगार म्हणून नावारूपाला येत आहे. या वर्षी मोठ्या प्रमाणात मकाची लागवड झाली होती. पावसामुळे नुकसान झाले असले तरी मकाला राज्यासह तमिळनाडू व आखाती देशातील मागणी असल्याने प्रथमच हंगामात विक्रमी बाजारभाव मिळत आहे." - कैलास व्यापारे, सचिव,बाजार समिती येवला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT