Animals eating dry crops esakal
नाशिक

Nashik Rain Crisis : चाऱ्याचे भाव गगनाला भिडले; पावसाअभावी प्रश्‍न गंभीर!

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain Crisis : सप्टेंबर महिना उजाडला असला तरी अद्याप अपेक्षित पाऊस न पडल्याने पेरणी झालेल्या शेतातील पिके करपू लागली आहेत. विहिरी कोरड्या पडल्या असल्याने पाण्याबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

यातच चाऱ्याचे भाव गगनाला भिडले असून पावसाअभावी यंदा खरीप हंगामातील हिरवा चाऱ्याचे उत्पादन देखील घटणार आहे. नांदगाव तालुका हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.

काही भागात उन्हाळ्यातील काही महिने पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावा लागतो. यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच या भागाला पावसाने ताण दिला आहे. (production of green fodder in Kharif season will decrease due to lack of rain manmad nashik news)

सुरुवातीला झालेल्या पावसावर या भागातील शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या. शेतात उगवून झालेली पिके आता पाऊस नसल्याने सुकू लागली आहे. त्यामुळे पेरण्या वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

यातच दुष्काळसदृश परिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून शेतकऱ्यांना इतर ठिकाणाहून हिरवा चारा विकत आणावा लागत आहे. पावसाने हुलकावणी दिल्याने खरिपातील चारा उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका पशुपालकांना बसत आहे.

सध्या चाऱ्याचे दर वाढले असून उसाचा दर ४ हजार रुपये टन, कडबा ३ हजार रुपये टन तर घास शेकडा दर पाचशे रुपये असून ढेप १ हजार नऊशे तर हिरवा मका २ हजार पाचशे रुपये आहे. वाढत्या दरामुळे तालुक्यातील शेतकऱ्याचे अर्थकारणच कोलमडले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विहिरींना पाणी होते.

त्यांनी काही प्रमाणात चारा पाण्याची सोय केली आहे. यंदा दुष्काळाचे चक्र पुन्हा फिरणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असून दूध व्यवसाय देखील संकटात सापडला आहे. दूध व्यवसाय हा चारा पाण्याचा खर्च परवडत नसल्याने शेतकऱ्यांना संकटात टाकणारा ठरत आहे. आज घडीला प्रत्येकाच्या जवळ असलेला मागील वर्षाचा चारा संपण्याच्या स्थितीत असून नवीन चाऱ्यासाठी शोधाशोध सुरू केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दुभत्या जनावरांना ताजा हिरवा चारा लागतो. या चाऱ्याची देखील वाणवा असून मिळेल त्या ठिकाणाहून मिळेल त्या किमतीत हिरवा चारा उपलब्ध करून घेतला जात आहे. काही शेतकऱ्यांना पाणी देखील विकत घेण्याची वेळ आली आहे.

त्यामुळे चाऱ्यासाठी अधिकचा खर्च शेतकऱ्यांच्या नुकसानीत वाढ करणारा ठरणार आहे. पुढील काळात पाऊस झाला नाही, तर चाऱ्याचे भाव अधिकच कडाडतील आणि जनावरे जगवावी कशी असा प्रश्‍न पशुपालक यांच्या समोर उभा राहणार आहे.

"यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मोठा बिकट झाला आहे. शेतातील पीक पावसाअभावी सुकून गेले आहे. मागच्या वर्षाचा चारा संपला आहे. त्यामुळे विकत चारा घेऊन जनावरे जगवावी लागत आहे. पाऊस झाला नाही तर जनावरे जगवावी कशी असा प्रश्न निर्माण होऊ शकतो" - राजू सानप, दूध व्यावसायिक

"तीन महिने होऊनही पाहिजे तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे यंदा दुष्काळ पडतो की काय अशी भीती वाटू लागली आहे.चारा नसल्याने शेतातल्या वाळलेल्या पिकात जनावरे सोडावी लागत आहे. यंदा चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर बनला आहे." - जालिंदर परदेशी, शेतकरी सटाणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT