Purushottam Awhad with Saved Dog
Purushottam Awhad with Saved Dog esakal
नाशिक

Nashik : पिल्लं दगावली, पण आईला वाचविण्यात प्राणीमित्राला यश

आनंद बोरा

नाशिक : वेळ सकाळची...सावरकरनगरमधील रहिवासी महिलेने प्राणीमित्र पुरुषोत्तम आव्हाड यांना मोबाईलवरून माहिती कळवली. दहा मिनिटात श्री. आव्हाड पोचले. या वेळी भटक्या श्‍वानाची (Stray Dog) मादी पोटात अर्धवट अडकलेल्या पिलाला घेऊन फिरत असल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. प्राणिमित्रांच्या प्रयत्नांना पोटात पिल्ले दगावली तरीही आईला वाचविण्यात यश मिळाले. (Purushottam Awhad gave life to stray dog Nashik News)

श्री. आव्हाड यांनी पाहिल्यावर तिच्या पोटात आणखी पिल्ले असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. मित्रांच्या मदतीने तिला पकडले. गो-शाळेतील ‘डिलिव्हरी’ च्या अनुभवामुळे त्यांनी तिच्या पोटातील मृत पिल्लू काढले. पण पोटात असलेली पिल्लांचे काय, असा प्रश्‍न कायम होता. मात्र सुटी असल्याने अशोक स्तंभावरील जनावरांचा दवाखाना (Veterinary clinic) बंद होता. मग त्यांनी सिद्धिविनायक रुग्णालयाचे संचालक डॉ. नितीन हिरे यांच्याशी संपर्क साधला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉ. हिरे यांनी रुग्णालयात श्‍वानाच्या पोटाच्या एक्स-रे (X Ray) व्यवस्था केली. एक्स-रे काढल्यावर पोटातील तीन पिल्ले मृत झाल्याचे निदर्शनास आले.

पोटातील मृत पिल्लांना शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्यासाठी आनंदवलीतील डॉ. सोनवणी यांनी जबाबदारी घेतली. डॉ. सोनवणी यांनी शस्त्रक्रिया करून पोटातील तीन पिल्ले बाहेर काढली. श्री. आव्हाड त्या श्‍वानाला घेऊन घरी गेले. दोन दिवसानंतर ते शुद्धीवर आले आणि श्‍वान श्री. आव्हाड यांच्या मांडीवर जाऊन बसले. श्री. आव्हाड यांनी श्‍वानाचा स्वतः सांभाळ करण्याचे ठरवले आहे. त्यांनी तिचे नाव ‘हिरा’ असे ठेवले आहे.

"नाशिकमध्ये अनेक भटकी जनावरे आहेत. त्यांच्याकडे लक्ष देणारी कोणतीही यंत्रणा नाही. मोजके प्राणीमित्र स्वखर्चाने त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अशा प्राणिमित्रांच्या मागे समाजाने उभे राहिले पाहिजे. त्यांना वेळेवर मदत मिळायला हवी. तसेच जनावरांचा दवाखाना सतत सुरु असावा असे वाटते." - पुरुषोत्तम आव्हाड, प्राणीमित्र

"मालक जनावरांना सोडून देतात. गाई कचराकुंडीतील प्लास्टिक खातात. त्यामुळे त्यांचे पोट फुगते. शस्त्रक्रिया करावे लागतात. माझ्या रुग्णालयामध्ये अनेक पक्षीमित्र जखमी पक्षी घेऊन येतात. आम्ही त्यांच्यावर मोफत उपचार करतो." - डॉ. नितीन हिरे, सिद्धिविनायक रुग्णालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT