Rains arrived in the city on Wednesday.  esakal
नाशिक

Rain News : उत्तर महाराष्ट्रात 15 सप्टेंबरपासून पावसाचा अंदाज; 70 ते 130 मिलिमीटरची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

Rain News : उत्तर महाराष्ट्रासाठी खूशखबर! हवामानशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, नांदेड, बीड, हिंगोलीमार्गे येणारा पाऊस उत्तर महाराष्ट्रात १५ ते १९ सप्टेंबरदरम्यान येण्याचा अंदाज आहे. तसेच या कालावधीत ७० ते १३० मिलिमीटर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत उत्तर महाराष्ट्रात १०६.५ टक्के पाऊस झाला होता. आता ६५.४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. १५ ते १९ सप्टेंबरदरम्यान पुणे-बेंगळुरू महामार्गाच्या पश्‍चिमेला घाट माथ्यावर पाऊस होण्याचा, तर पूर्वेकडे कमी पाऊस होण्याचा अभ्यासकांचा अंदाज आहे. (Rain forecast in North Maharashtra from September 15 nashik jalgaon dhule nandurbar news)

याशिवाय २८ ते २९ सप्टेंबदरम्यान परतीच्या पावसाच्या ढगांमुळे ३ ते ५ ऑक्टोबरपर्यंत वळीव स्वरूपात पाऊस होण्याची शक्यताही हवामानशास्त्राच्या अभ्यासकांनी वर्तवली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६१.६ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी या कालावधीत १२५.७ टक्के पाऊस झाला होता.

तिसगाव, गिरणामध्ये कमी साठा

जिल्ह्यातील २४ पैकी आळंदी, वाघाड, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर, नांदूरमध्यमेश्‍वर ही धरणे भरली आहेत. मात्र तिसगावमध्ये २९, तर मालेगावसह खानदेशचा पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या गिरणामध्ये ५३ टक्के साठा झाला आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ९५ टक्के साठा ठेवण्यात आला आहे.

गंगापूर धरणसमूहात ९०, पालखेड धरणसमूहात ९३, ओझरखेड समूहात ८०, दारणा समूहात ९३, गिरणा खोरे समूहात ७९ टक्के साठा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील टंचाईची परिस्थिती संपुष्टात येण्यासाठी आणखी पावसाची आवश्‍यकता आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शिवाय द्राक्षांच्या ऑक्टोबर छाटणीला वेग येण्यासोबतच कांदा आणि भाजीपाला लागवडीसाठी आणखी पाऊस अपेक्षित असून, हवामानशास्त्र अभ्यासकांच्या अंदाजानुसार पाऊस होण्यातून रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील पाऊस

(आकडे टक्क्यांमध्ये)

० मालेगाव-५४.४ ० पेठ-७३.३

० बागलाण-७१.१ ० निफाड-७०.३

० कळवण-१०४.५ ० सिन्नर-४९

० नांदगाव-४७.२ ० येवला-६६.३

० सुरगाणा-७६.४ ० चांदवड-६३.५

० नाशिक-६०.८ ० त्र्यंबकेश्‍वर-६८.५

० दिंडोरी-११९.२ ० देवळा-६९.२

० इगतपुरी-५०.४ ० एकूण-६९.२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance : आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’चा भार; सर्वसामान्यांचे बिघडतेय आर्थिक गणित

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT