Rain Sakal
नाशिक

Nashik Rain News : पाऊस आला; पण खरीप गेला...! जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; धरणांमधून विसर्ग सुरू

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain News : महिनाभर वाट पाहायला लावलेल्या पावसाचे गुरुवार (ता. ७)पासून जिल्ह्यात दमदार आगमन झाल्याने शेतकरी आनंदित झाला आहे. पण, खरिपाची पिके हाताबाहेर गेल्याने या पावसाचा त्यांना काहीच फायदा होणार नाही.

भात व नागली ही पिके वाचतील. गेल्या २४ तासांत झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील महत्त्वाच्या धरणांमधून विसर्ग सुरू झाला. त्यामुळे गोदावरी नदी पहिल्यांदाच खळाळली असून, दुतोंड्या मारुतीच्या पायाला पाणी लागले आहे. (rain in nashik news monsoon update news)

जून व जुलैतील रिमझिम पावसाच्या भरवशावर जिल्ह्यात ९२ टक्के खरिपाची पेरणी झाली. पिके ऐन जोमात असताना ऑगस्टमध्ये पावसाने ओढ घेतली आणि खरीप हंगामातील पिकांनी मान टाकली. मका, बाजरी, कपाशी, सोयाबीन, तूर, उडीद ही महत्त्वाची पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेली आहेत. या पावसाचा त्यांना फारसा फायदा होणार नाही.

कृषी विभाग व ओरिएन्टल पीकविमा कंपनीने ऑगस्टमध्ये केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात कमीत कमी ६० ते जास्तीत जास्त ९९ टक्के नुकसान झाल्याची नोंद त्यांच्या अहवालात आहे. ऑगस्टमध्येच पावसाची खरी गरज होती. मात्र, तो महिना पूर्णत: कोरडा गेल्याने आता सप्टेंबरमध्ये पावसाचे आगमन झाले.

त्याचा भात व नागली या पिकांना निश्चितपणे फायदा होईल. तसेच, पावसाचे प्रमाण कायम राहील आणि विहिरींना पाणी येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागून आहे. त्यानंतरच पुढील पिकांची लागवड किंवा पेरणी करणे शक्य आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

२४ तासांत ७२ मिलिमीटर पाऊस

गेल्या २४ तासांत नाशिक शहरात तब्बल ७२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शहरात अतिवृष्टी झालेली असली तरी पावसाची आवश्यकता असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला. गुरुवारी (ता. ७) सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेअकरापर्यंत १० मिलिमीटर पाऊस झाला; तर शुक्रवारी (ता. ८) सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाचपर्यंत ६२ मिलिमीटर पाऊस झाल्याचे हवामान विभागाने सांगितले. रात्री झालेल्या पावसाची नोंद उपलब्ध झालेली नाही. शहरात वरुणराजाची कृपादृष्टी झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

धरणांतून सुरू असलेला विसर्ग (सायं. ६)

कडवा- ५४७४ क्यूसेक

पालखेड- ६७३२ क्यूसेक

गंगापूर- ६२८२ क्यूसेक

नांदूरमध्यमेश्वर- ४८४२ क्यूसेक

चणकापूर- ३३ हजार क्यूसेक

पुनद- १६ हजार क्यूसेक

हरणबारी- ५५०० क्यूसेक

केळझर- ५ हजार क्यूसेक

आळंदी- २१० क्यूसेक

दारणा- १४०० क्यूसेक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर,काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT