Rain Sakal
नाशिक

नाशिक : निफाड तालुक्यात पावसाने मोडला पाच वर्षांचा विक्रम

परतीच्या पाऊस अजूनही वाजतगाजत सुरू असताना निफाड तालुक्यात रेकॉर्ड ब्रेक हजारी लावत गेली पाच वर्षाचा विक्रम मोडला आहे.

दीपक अहिरे

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : परतीच्या पाऊस अजूनही वाजतगाजत सुरू असताना निफाड तालुक्यात रेकॉर्ड ब्रेक हजारी लावत गेली पाच वर्षाचा विक्रम मोडला आहे. निफाड तालुक्यात आतापर्यत चार महिन्यात ५५८ मिलिमीटर म्हणजे ११६ टक्के पावसाची बरसात झाली आहे. अजूनही पावसाचा मुक्काम कायम असल्याने यात वाढ होणार आहे. विक्रमी पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा व शेतीसिंचनाचा प्रश्‍न यंदा मार्गी लागला असला तरी शेतीपिकांची मोठी नासाडी धो-धो बरसलेल्या पावसाने केली आहे.


निफाड तालुका तसा हमखास पावसाचा परिसर म्हणून ओळखला जातो. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सरासरी ४८० मिलिमीटर पाऊस दरवर्षी होत असतो. गेली दोन वर्षे मात्र पावसाने वक्रदृष्टीने केल्याने टंचाईचा सामना निफाड तालुक्याला करावा लागला होता. सन २०१६ पासनू पावसाचे प्रमाण काहीसे घसरले आहे. यंदा मात्र पावसाने लेट पण थेट एन्ट्री केली. दिर्घ विश्रांतीनंतर दमदार बॅटींग करत पावसाने निफाड तालुका अक्षरशा झोडपून काढला. सरासरीच्या तुलनेत आतापर्यत तब्बल ११६ टक्के पावसाचे नोंद झाली आहे.

ओला दुष्काळाची स्थिती निफाडच्या पूर्व भागात निर्माण झाली आहे. अजूनही पावसाने परतीची वाट धरलेली दिसत नाही. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यात हिट ऐवजी पाऊस कुल करणार असे दिसते. पावसाच्या अतिमेहरबाणीमुळे द्राक्षउत्पादक धास्तावले आहेत. द्राक्ष हंगामासाठी महत्त्वाची असलेली फळधारणा छाटणी पावसाच्या कचाट्यात अडकली आहे. काढणीला आलेले सोयाबीनचे पीक पावसामुळे सडू लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: भ्रष्टाचाराच्या गोष्टी फडणवीसांनी करू नये, आपलं ठेवायचं झाकून...; राज ठाकरेंनी अजित पवार अन् बैलगाडी सर्व काढलं

T20 World Cup : शुभमन गिलची भारताच्या ट्वेंटी-२० संघात होणार एन्ट्री? पडद्यामागून घडल्या बऱ्याच घडामोडी, BCCI म्हणते...

Sandeep Deshpande MNS : मनसे सोडणार? संदीप देशपांडे यांनी एका वाक्यात कंडका पाडला...

Raj Thackeray : ठाकरेंचे आमदार गुवाहाटीला कसे नेले? बँकेतून लोन तर नव्हतं ना? राज ठाकरेंनी सांगितलं ५० खोक्यांचं गणित...

Mumbai Municipal Election : मुंबई महापालिकेसाठी फॉर्म्युला ठरला; ठाकरे बंधूंचा शाखाभेटींवर जोर, एकच संयुक्त सभा होणार

SCROLL FOR NEXT