Scene of children's drama performed in 19th State Children's Drama Competition esakal
नाशिक

Rajya Balnatya Spardha : बालनाट्य स्पर्धेची तिसरी घंटा वाजली; 15 बालनाट्यांचे होणार सादरीकरण

प्रतीक जोशी

नाशिक : १९ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची तिसरी घंटा शुक्रवारी (ता. ६) नाशिक केंद्रावर जल्लोषात वाजली. मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन झाले. या वेळी रवींद्र कदम, राजेश जाधव, मीना वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. यंदा नाशिक केंद्रावर १५ बालनाट्यांचे सादरीकरण होणार आहे. मंजूषा जोशी, शंकर घोरपडे, डॉ. गणेश शिंदे हे स्पर्धेचे परिक्षण करणार आहेत. दरम्यान, स्पर्धेत शुक्रवारी एकूण चार नाटकांचे सादरीकरण झाले. (Rajya Balnatya Spardha 15 children dramas will be presented on nashik center nashik news)

सुरवातीला श्री. स्वामिनारायण स्कूलतर्फे ‘पुन्हा नको रे बाबा’ हे नाटक सादर झाले. गिरीश जुन्नरे लिखित या नाटकाचे मनीषा एकबोटे यांनी दिग्दर्शन केले. पार्थ पाटील, स्वरा भामरे, साहिल जाधव, पलक गुजराथी, दिव्या प्रवीण कदम, सौम्या यशोद, भाग्येश बैरागी, जय थोरात, सार्थक खैरे, अर्णव संकपाळ, ओजस खरात, शरयू चौधरी या बालकलाकारांनी अभिनय केला.

सीमा थोरात यांनी रंगभूषा, तर गायत्री सोनवणे यांनी वेशभूषा साकारल्या. नाटकाची प्रकाशयोजना कौस्तुभ एकबोटे यांनी तर संगीत संयोजन चैत्राली गोंधळी यांनी केले. यानंतर श्री. सप्तशृंगी शिक्षण संस्था, पंचवटीतर्फे ‘वारी’ हे नाटक सादर झाले.

जयेश जोशी लिखित या नाटकाचे दिग्दर्शन सागर रत्नपारखी यांनी केले. नाटकात श्रीधर कुलकर्णी, अनघा थोरात, आदित्या निकाळे, साईष विटकरे, गार्गी मोहिते, ओजस्वी खैरनार, साक्षी रावत, श्रुती मुठाळ, ईशा शेलार, वैष्णवी मोरे, मृदुला मिराजे, अक्षरा कर्डक, लक्षिता घोडे, श्रेया जाधव, नेहा लोढा, मृण्मयी शिंपी या बाल कलाकारांनी अभिनय केला.

नाटकाचे नेपथ्य राजश्री मोरे, सचिन पगारे यांनी तर प्रकाशयोजना हर्ष कुलकर्णी यांनी साकारली. पात्रांच्या रंगभूषा हर्षद पाचोरकर यांनी तर वेशभूषा आराधना आहिरे यांनी साकारल्या.

कमलेश शिंदे, अनघा थोरात, मृण्मयी शिंपी यांनी संगीत दिले तर ओंकार दळवी, अनुजा चंद्रात्रे यांनी नृत्य दिग्दर्शन केले. या दोन नाटकांच्या सादरीकरणानंतर रंगकर्मी थिएटर्स, नाशिकतर्फे ‘जिर्णोद्धार’ हे नाटक सादर झाले.

संध्या कुलकर्णी लिखित या नाटकाचे दिग्दर्शन सिद्धी बोरसे यांनी केले. त्रिरश्‍मी गांगुर्डे, स्मिता बनसोडे, श्र्लोक चव्हाण, शमिका कांदेकर, जुई पाचपाटील, सई सोनवणे, मल्हार धारणकर, शंभु सोनवणे, मयंक कदम, भार्गवी सुलक्षणे, सलोनी मुळे, हर्षदा घोडके, प्रज्ञेश लावरे, गार्गी दिवटे, भार्गव सुलक्षणे या बालकलाकारांनी नाटकात भूमिका साकारल्या.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

यश आरोटे, ऋषीकेश शिरसाट, अद्वैत जोशी यांनी नाटकाचे नेपथ्य केले तर जयदीप पवार यांनी प्रकाश योजना साकारली. सिद्धी बोरसे यांनी पार्श्‍वसंगीत दिले. साक्षी बनकर, सीमा पाठक यांनी वेशभूषा तर माणिक कानडे यांनी रंगभूषा साकारल्या. चिराग, रुद्राक्ष, वैष्णवी, आदिती यांनी रंगमंच साहाय्य केले. यानंतर जोधराज रामलाल सिटी हायस्कूल, धुळे तर्फे ‘सप्तरत्ने’ हे बालनाट्य सादर झाले.

रेखा बारी या नाटकाच्या लेखक आणि दिग्दर्शक आहेत. लोकेश मराठे, सुनयना चव्हाण, हितेश बडगुजर, डिंपल पांडे, विशाल मोरे, निर्मल झेंडे, अर्णव कासार, कौस्तुभ देवरे, प्रगती वाघ, भुवनेश्वर सोनार, रोशनी शेख, नैतिक कासार, साईराज पाटील, अथर्व बारी या बालकलाकारांनी या नाटकात अभिनय केला.

किरण मांडे यांनी नेपथ्य तर भूपेंद्र गांगुर्डे यांनी प्रकाशयोजना साकारली. एस. जी. गोसावी यांनी नाटकाला संगीत दिले. सीमा जोशी यांनी रंगभूषा तर शारदा सोनकांबळे यांनी वेशभूषा साकारल्या. स्पर्धेत शुक्रवारी एकूण ५ नाटके सादर होणार होती मात्र काही कारणास्तव सचिन शिंदे ॲकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स तर्फे सादर होणारे ‘आराधरी’ हे बालनाट्य सादर झाले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT