Shower of flowers and greetings by guardian minister Dada Bhuse as soon as the curtain opened at 12 o'clock sharp on Thursday at Kalaram temple.
Shower of flowers and greetings by guardian minister Dada Bhuse as soon as the curtain opened at 12 o'clock sharp on Thursday at Kalaram temple. esakal
नाशिक

Ram Navami 2023 : ध्यान लागले रामनामी, रुप रामाचे पाहू! काळाराम संस्थानतर्फे रामजन्मोत्सव उत्साहात!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कौसल्यराणि हळू उघडी लोचनें

दिपून जाय माय स्वत: पुत्र दर्शने

ओघळते आसू, सुखे कंठ दाटला

राम जन्मला ग सखे राम जन्मला!

हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत, मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचा (Ram Navami 2023) जन्म पंचवटीतील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरासह शहरात पारंपरिक उत्साहात व मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा झाला. (ram navami 2023 celebrated with great enthusiasm in kalaram mandir nashik news)

काळाराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सवावेळी गुरुवारी रंगलेल्या फुगड्या आणि टाळाचा सुरू असलेला गजर, डमरु वाजवताना चिमुकला

गर्दीचे नियोजन करण्यासाठी पूर्व दरवाजाने प्रवेश देऊन उत्तर दरवाजाने भाविकांना बाहेर सोडण्यात येत होते. जन्मोत्सवाच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पंचवटी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

दरवर्षीप्रमाणे येथील काळाराम मंदिरात श्री रामजन्मोत्सव अभूतपूर्व वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार ॲड.राहुल ढिकले, प्रा. देवयानी फरांदे यांच्यासह काळाराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश उमेशचंद्र मोरे, विश्वस्त धनंजय पुजारी, मंदार जानोरकर, डॉ.एकनाथ कुलकर्णी, शुभम मंत्री यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

पहाटे साडेपाच वाजता महंत सुधीरदास पुजारी यांच्या हस्ते काकड आरती करण्यात आली. यानंतर सकाळी ७ वाजता यंदाचे मानकरी बुवा समीर पुजारी यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. तर दुपारी बारा वाजता मंदिर गाभाऱ्यास बंद पडद्याआड सुरू असलेला पूजाविधी पूर्ण झाल्यावर पडदा उघडण्यात आला.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

काळाराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सवावेळी गुरुवारी पायऱ्यांवर दर्शनासाठी झालेली भाविकांची गर्दी.

पडदा उघडताक्षणी उपस्थित भाविकांनी रामनामाचा जयघोष करीत व पारंपारिक वाद्याच्या गजरात रामजन्म साजरा करण्यात आला. मंदिर प्रशासनाकडून भाविकांना रामजन्म बघण्यासाठी मंदिर परिसरात एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. जन्मोत्सवानिमित्त मंदिर परिसरात सुबक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या.

सायंकाळी ७ वाजता काळारामास ५६ प्रकारचे नैवेद्य अर्पण करून अन्नकोट मानकरी बुवा समीर पुजारी यांच्याहस्ते संपन्न झाला. रात्री ८ वाजता हेमंत पुजारी यांच्या हस्ते शेजारती करण्यात आली. दरम्यान, भाविकांनी दिवसभर काळाराम मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मंदिराचा मुख्य पूर्व दरवाजाने भाविकांना प्रवेश दिला जात होता.

तर उत्तर व दक्षिण दरवाजाने या भाविकांना बाहेर सोडण्यात येत होते. यावेळी संस्थानतर्फे भाविकांना पाचशे किलो प्रसादाचे प्रसादाचे वाटप करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पंचवटी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मंदिराकडे येणारे सर्वच रस्ते बॅरीकेटिंगद्वारे बंद करण्यात आले होते.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

विविध भागांत विलोभनीय सोहळा

शहरातील विविध ठिकाणच्या राममंदिरात मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी करण्यात आली. आकर्षक फुलांची आरास तयार करून मंदिरांची सजावट तसेच प्रवेशद्वारावर सुबक रांगोळी रेखाटून त्यात रामाचे चित्र साकारले. रामनवमीचा हा विलोभनीय सोहळा शहराच्या विविध भागांत पार पडला.

राम मंदिरात सकाळपासून भाविकांची एकच गर्दी झाली. भजन गात महिलांनी रामनवमीचा उत्साह द्विगुणित केला. महिलांनी नऊवारी साड्या परिधान करत मंदिरात रामाची पूजा केली. मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. विविध सामाजिक संस्थांनी यात सहभाग घेतला.

विशेषतः दुपारी बारापर्यंत आलेल्या भाविकांना उपवासाचे पदार्थ देण्यात आले. तर दुपारनंतर भोजनासह फळांचेही वाटप झाले. मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या विचारात घेऊन फूल विक्रेत्यांनी फुलांची हार जास्त प्रमाणात बनवले होते. तर गुलाब, झेंडूच्या फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात होती. देवाला फुले वाहून त्याचे मनोभावे पूजन करत भाविकांनी आपली मनोकामना सांगितली. पंचवटीसह इंदिरानगर, गंगापूर रोड, नाशिकरोड, सिडको या भागातील मंदिरांमध्ये हा उत्सव साजरा झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT