Defence Park File Photo esakal
नाशिक

Nashik News: नाशिक डिफेन्स पार्कसाठी राज्य शासनाकडून केंद्राला शिफारस

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : डिफेन्स पार्क उभारण्यासाठी नाशिक हे उत्तम शहर असून, त्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या पायाभूत सोयी-सुविधा नाशिक येथे उपलब्ध असल्याने या ठिकाणी डिफेन्स पार्क उभारण्यात यावे, यासाठीची शिफारस आज राज्य शासनाने केंद्र सरकारकडे केली. (Recommendation from State Government to Center for Nashik Defense Park Nsahik News)

डिफेन्स पार्कसाठी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे शिफारस केल्याने पार्क उभारणीच्या प्रस्तावाचा पहिला आणि महत्त्वपूर्ण टप्पा पार केल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

खासदार गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची मुंबईत भेट घेत डिफेन्स पार्क उभारण्यासाठी नाशिक शहर कसे उपयुक्त आहे, हे त्यांच्या लक्षात आणून दिले होते.

केंद्र सरकारने वर्षभरापूर्वी डिफेन्स इनोव्हेशन हबची घोषणा केलेली असून, हब स्थापनेची प्रक्रिया सुरू झाल्याचे उदय सामंत यांच्या निदर्शनास आणून देत डिफेन्स पार्कसाठी अत्यावश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या पायाभूत सोयीची मागणी केली.

उद्योगमंत्री सामंत यांनी त्यांच्या मागणीची दखल घेत डिफेन्स पार्क नाशिकला उभारावे, अशी शिफारस आज राज्य शासनाने केंद्रीय वाणिज्य, उद्योगमंत्री पीयूष गोयल आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT