exam final.jpg
exam final.jpg 
नाशिक

सरकारी बँकेत १ हजार १६७ पदांसाठी भरती...'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज...वाचा सविस्तर बातमी

अरुण मलाणी

नाशिक : इन्‍स्‍टिट्यूट ऑफ बँकींग पर्सोनेल सिलेक्‍शन (आयबीपीएस) यांच्‍यातर्फे सरकारी बँकांमध्ये रिक्‍त पदांकरीता परीक्षेचे वेळापत्रक जारी केले आहे. विविध बँकांतील १ हजार १६७ पदांसाठी होणाऱ्या या परीक्षेकरीता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी २६ ऑगस्‍टपर्यंत मुदत असेल. तर पूर्व, मुख्य परीक्षा व मुलाखत अशा तीन टप्‍यांमध्ये परीक्षेची प्रक्रिया पार पडणार आहे. 

अर्ज करण्यासाठी २६ ऑगस्‍टपर्यंत मुदत

प्रोबेजनरी ऑफिसर, मॅनेजमेंट ट्रेनि पदाकरीता ही भरती प्रक्रिया राबविली जाते आहे. बँकींग क्षेत्रातील या पदांकरीता अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला बुधवारी (ता.५) सुरवात झाली असून, इच्‍छुक पात्र उमेदवारांना ऑनलाइन स्‍वरूपात अर्ज भरत याच मुदतीत शुल्‍क अदा करावे लागणार आहे. भरलेल्या अर्जाची प्रत प्राप्त करून घेण्याकरीता १० सप्‍टेंबरपर्यंत मुदत असणार आहे. किमान पदवी शिक्षण पूर्ण झालेल्‍या उमेदवारांना या परीक्षेसाठी प्रविष्ठ होता येईल. याशिवाय वय व अन्‍य विविध अटींची पूर्तता करावी लागणार आहे. प्रचलीत नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत मिळेल. विविध सरकारी बँकांमध्ये नोकरी मिळवत चांगले करीअर घडविण्यासाठी उमेदवारांना ही चांगली संधी उपलब्‍ध झाली आहे. 

परीक्षेच्‍या संभाव्‍य तारखा अशा 

आयबीपीएसतर्फे सविस्‍तर वेळापत्रकाचे सूचनापत्र जारी केले आहे. त्‍यानुसार ऑनलाइन स्‍वरूपात पूर्व परीक्षा ३, १० व ११ ऑक्‍टोबरला घेण्याचे नियोजित आहे. या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्‍यानंतर पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेकरीता कॉल लेटर पाठविले जातील. अशा उमेदवारांची मुख्य परीक्षा २८ नोव्‍हेंबरला घेतली जाईल. डिसेंबरमध्ये मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला जाण्याचे नियोजित आहे. यानंतर मुलाखतीकरीताचे पत्र जानेवारी २०२१ मध्ये उपलब्‍ध करून दिले जाईल. जानेवारी-फेब्रुवारी महिन्‍यात मुलाखती घेतल्‍यानंतर प्रारूप निवड एप्रिल २०२१ मध्ये जाहीर केली जाणार आहे. महाराष्ट्रात नाशिकसह मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, अमरावती, औरंबाबाद, चंद्रपूर, जळगाव, कोल्‍हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, रत्‍नागिरी, सोलापूर येथे परीक्षा केंद्र असणार आहेत. 

प्री-एक्‍झामिनेशन ट्रेनिंग 
मुंबई, औरंगाबाद, नागपूरमध्येच 

परीक्षेचे स्‍वरूप व अन्‍य बाबी लक्षात याव्‍यात याकरीता प्री-एक्‍झामिनेशन ट्रेनिंग सुविधा उपलब्‍ध करून दिली जात असते. परंतु सध्याच्‍या कोरोना प्रादुर्भावाच्‍या काळात देशातील निवडक शहरांमध्येच ही सुविधा उपलब्‍ध असणार आहे. या यादीत राज्‍यातील मुंबई, औरंगाबाद व नागपूर या तीन शहरांचा समावेश केला आहे. 

उपलब्‍ध जागांचा तपशील असा

बँक ऑफ इंडिया ७३४ 
युको बँक ३५० 
पंजाब ॲण्ड सिंध बँक ८३ 

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT