Radhakrishna Game esakal
नाशिक

Teachers Constituency Election : शिक्षक मतदारसंघासाठी शनिवारपासून नोंदणी : राधाकृष्ण गमे

सकाळ वृत्तसेवा

Teachers Constituency Election : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिक्षक मतदारसंघासाठी शनिवार (ता. ३०)पासून मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार उत्तर महाराष्ट्रात मतदार नोंदणी सुरू होईल. मतदार नोंदणीसाठी या वेळपासून आधार, फोटोसह सलग तीन वर्षे अध्यापनाचा अनुभव ग्राह्य धरला जाणार आहे.

मतदार नोंदणी अर्जात सुधारणा केलेली असल्याने मागील निवडणुकांचे जुने अर्ज चालणार नाहीत, अशी माहिती विभागीय आयुक्त तथा नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी राधाकृष्ण गमे यांनी बुधवारी (ता. २७) येथे दिली. (Registration for Teachers Constituency from 30 sep nashik news)

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महसूल उपायुक्त रमेश काळे, अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार आदी उपस्थित होते. तत्पूर्वी, निवडणूक विभागातर्फे राजकीय पक्षांची बैठक झाली.

आयुक्त गमे म्हणाले, की शनिवारी नोंदणी प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून ६ नोव्हेंबरपर्यंत शिक्षकांना मतदार नोंदणी करता येणार आहे. दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्य निवृत्त होणाऱ्या विधान परिषदेसाठी प्रत्येक निवडणुकीवेळी मतदार नोंदणी करावी लागते.

केवळ शिक्षकांसाठी असलेल्या या निवडणुकीसाठी सलग सहा वर्षे सेवेत आणि सलग तीन वर्षे अध्यापनाचा अनुभव असलेल्या शिक्षकांनाच मतदार यादीत नावनोंदणी करता येते. मागील निवडणुकीत ५३ हजार मतदारांनी नोंदणी केली. या वेळी १०० टक्के म्हणजे ५९ हजारांवर मतदारांची नोंदणी करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

शिक्षण विभागाकडून प्रमाणिकरण

शिक्षण संस्थेतील शिक्षकांना त्या-त्या शाळेतील अध्यापनाच्या अनुभवाचे मुख्याध्यापकांकडून प्रमाणिकरण करून नावे द्यावी लागतील.

ही माहिती शिक्षण विभागाकडून तपासून घेतली जाईल. मतदारांच्या रहिवास पुराव्याची खातरजमा करण्याचे काम महसूल यंत्रणा करेल. मतदार नोंदणीसाठी भरलेले अर्ज शिक्षण संस्थांना जमा करावे लागतील. बीएलओ, राजकीय पक्ष उमेदवारी अर्ज जमा करू शकणार नाहीत.

या वेळी मतदार अर्जाबरोबर आधार क्रमांक, छायाचित्र, मोबाईल क्रमांकाची नोंद अनिवार्य करण्यात आली आहे. मतदार तहसील कार्यालय, निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करू शकणार आहेत. उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांतील सर्व तहसील कार्यालयांत मतदार अर्ज वितरणाची सोय करण्यात आली आहे, असेही गमे यांनी सांगितले.

निवडणूक कार्यक्रम

- मतदार नोंदणी जाहीर सूचना प्रसिद्धी : ३० सप्टेंबर २०२३

- मतदार नोंदणी दैनिकांत सूचना पुनःप्रसिद्धी : १६ ऑक्टोबर

- मतदार नोंदणी दैनिकांत सूचना दुसरी प्रसिद्धी : २५ ऑक्टोबर

- हरकती, दावे स्वीकारण्याचा अंतिम दिवस : ६ नोव्हेंबर

- प्रारूप मतदार याद्यांची छपाई : २० नोव्हेंबर

- प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी : २३ नोव्हेंबर

- दावे, हरकती स्वीकारण्याचा कालावधी : २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर

- हरकती निकाली काढून पुरवणी यादी छपाई : २५ डिसेंबर २०२३

- मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी : ३० डिसेंबर २०२३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT