d-ed-8070.jpg 
नाशिक

नव्या धोरणाचा परिणाम! डी. एड. पदविका प्रवेशाला उतरती कळा; यंदाही प्रवेशसंख्या घटली

विजय पगार

नाशिक : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांमध्ये प्राथमिक स्तरावर बी. एड. पदवी ग्राह्य धरली जाणार आहे. येणाऱ्या काळात डी. एड. पदविका कालबाह्य होण्याचा धोका असल्यामुळे या वर्षीही डी. एडच्या प्रवेशाला गळती लागली आहे. 

यंदाही प्रवेशसंख्या घटली

राज्यात दहा वर्षांपासून डी. एड पदविकेला विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत. राज्यात एकूण मंजूर असलेल्या प्रवेश क्षमतेपैकी अवघे ३५ टक्के प्रवेश शिक्षणशास्त्र पदविकेला होत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे प्राथमिकसाठी डी. एड. पदविका येणाऱ्या काळात कालबाह्य होण्याचा धोका आहे. राज्यात १४ डी. एड. शासकीय विद्यालये आहेत. त्यात ७९७ इतकी क्षमता असून, गेल्या वर्षी केवळ ५३६ प्रवेश झाले आहेत अनुदानित ९७ अध्यापक विद्यालये असून, चार हजार ५४५ प्रवेश क्षमता असून, त्यापैकी केवळ तीन हजार १८० प्रवेश झाले आहेत. 

नेक संस्थाचालकांनी यापूर्वीच कुलूप लावले

७२० विनाअनुदानित अध्यापक विद्यालये असून, ४६ हजार ६२० प्रवेश क्षमता आहे. त्यापैकी अवघे १४ हजार २६५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. अशा एकूण ८३१ अध्यापक विद्यालयातील ५१ हजार ९६२ प्रवेश क्षमतेच्या विद्यार्थ्यांपैकी केवळ १७ हजार ९८१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. राज्यात कधीकाळी एक लाख विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता होती, त्या प्रवेशांना गळती लागून आता प्रवेश क्षमतेच्या अवघी ३५ टक्के विद्यार्थी प्रवेश घेत असल्याचे चित्र आहे. राज्यात सध्या ७३१ अध्यापक विद्यालये आहेत. शासनाने यापूर्वीच स्वतःची अध्यापक विद्यालये बंद केली आहेत, तर अनेक संस्थाचालकांनी यापूर्वीच कुलूप लावले आहे. 

दृष्टिक्षेपात नाशिक जिल्हा 

विद्यालयांची संख्या : ३० 
प्रवेशसंख्या (विद्यालय) : २७ 
जागा : एक हजार ५३० : ८३६ 
गुणवत्तायादी प्रसिद्धी तारीख : १४ सप्टेंबर  

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शेतकऱ्यांच्या DBT वर दसऱ्यापर्यंत मदत जमा करणार'; अजित पवार यांचे आश्‍वासन, सर्वांना सोबत घेऊन चालण्याचीही दिली ग्वाही

Pune Traffic App : वाहनचालकांवर मोबाईलवरूनच कारवाई, ‘पुणे ट्रॅफिक’ ॲपला प्रतिसाद; आतापर्यंत ४२ हजार तक्रारी

Shivram Bhoje Death : ख्यातकीर्त ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगाव येथे आज होणार अंत्यसंस्कार

Latest Marathi News Updates : पंतप्रधान मोदींना डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन; 75 व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

Mumbai Monorail : मुंबईकरांसाठी मोठी बातमी ! मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद , MMRDA ने का घेतला निर्णय ?

SCROLL FOR NEXT