Nashik News: राज्यातील तीन नदीजोड प्रकल्पांना शनिवारी (ता. १६) छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाल्याने दमणगंगा अप्पर वैतरणा कडवा देवलिंक प्रकल्पाचा प्रस्ताव आता राज्याकडून केंद्राकडे पाठविला जाणार आहे. (River connection project announced in state cabinet proposal for funding will be sent to Center soon Nashik News)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरला झालेल्या बैठकीत प्रकल्पांसाठी १४ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
या तीन नदीजोड प्रकल्पांत सिन्नर तालुक्याचा दुष्काळी तालुका हा कलंक कायमचा पुसल्या जाणाऱ्या दमणगंगा- अप्पर वैतारणा- कडवा- देवलिंग या नदीजोड प्रकल्पाचा समावेश आहे.
दमणगंगा- अप्पर वैतरणा- कडवा- देवलिंग या नदीजोड प्रकल्पास आता लवकरच राज्यस्तरीय तांत्रिक समितीची मान्यता मिळणार असून, निधी उपलब्धतेसाठी नदीजोड प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्राकडे सादर केला जाणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनीदिली.
सिन्नरचा भाग्योदय
वैतरणा खाडीतून समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून ते पाणी गोदावरी खोऱ्यात टाकल्यास सिन्नर तालुक्यासाठी साडेसहा टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकेल, हा विषय जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव आणि खासदार गोडसे यांनी तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
शासनाने काही दिवसांपूर्वी नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट ॲथोरिटी कंपनीकडून प्रस्तावित अप्पर वैतरणा- कडवा- देवलिंक नदीजोड प्रकल्पाचे सर्वेक्षण आणि डीपीआर तयार करून घेतला होता.
कंपनीने नदीजोड प्रकल्पाचा साडेसात कोटींचा अंतिम अहवाल १५ दिवसांपूर्वीं शासनाला सादर केला.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत दमणगंगा- अप्पर वैतरणा- कडवा- देवलिंक या नदीजोड प्रकल्पासह दमणगंगा- एकदरा- गोदावरी आणि पार- कादवा- गोदावरी नदीजोड प्रकल्पांसाठी १४ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनीच जाहीर केल्याने तिन्ही नदीजोड प्रकल्पांमुळे नाशिक, नगर आणि मराठवाड्याला १४ टीएमसी जादा पाणी उपलब्ध होणार आहे.
अप्पर वैतरणा- कडवा- देवलिंक या प्रकल्पाचा प्रस्ताव राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीच्या मान्यतेनंतर निधीसाठी केंद्र सरकारकडे जाणार असल्याने दमणगंगा- अप्पर वैतरणा- कडवा- देवलिंक या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची प्रतीक्षा संपणार असून, सिन्नर तालुक्यातील सिंचनाचा मोठा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे खासदार गोडसे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.