road from Garware Point to Xlo Point and Papaya Nursery will be developed at 40 crore rupees nashik news
road from Garware Point to Xlo Point and Papaya Nursery will be developed at 40 crore rupees nashik news esakal
नाशिक

Road Development : औद्योगिक वसाहतीतील रस्त्याचे भाग्य उजळणार; 40 कोटीची तरतूद

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कॉलेज रोडच्या धर्तीवर शरणपूर रोड ते गंगापूर नाक्यापर्यंतचा रस्ता मॉडेल म्हणून विकसित करण्याबरोबरच अनेक वर्षांपासून मागणी असलेला सिडको विभागातील गरवारे पॉइंट ते एक्स्लो पॉइंट (XLO Point) व पुढे पपया नर्सरीपर्यंचा औद्योगिक वसाहतीतील रस्ता विकसित केला जाणार असून त्यासाठी चाळीस कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. (road from Garware Point to Xlo Point and Papaya Nursery will be developed at 40 crore rupees nashik news)

अवजड वाहनांची वर्दळ तसेच वांरवार खोदकाम झाल्याने रस्त्याची दुरवस्था होती. रस्ता रुंदीकरण झाल्यानंतर अंबड मार्गे त्र्यंबककडे जाणारी वाहतूकदेखील या भागातून वळविली जाणार आहे.

महापालिकेने २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे दोन हजार ४७७ कोटींचे अंदाजपत्रक शुक्रवारी (ता. ३) सादर केले. अंदाजपत्रकामध्ये ७०१ कोटी रुपये विकासकामांवर खर्च केले जाणार असून यातही रस्ते कामांसाठी जवळपास १८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. २९९ कोटी रुपये बांधकाम, विद्युत, उद्यान व मलनिस्सारण विभागासाठी खर्च केले जाणार आहे.

रस्त्यांची कामे करताना यंदाच्या अंदाजपत्रकामध्ये विशेष करून मोठ्या रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहे. सीबीएस ते कॅनडा कॉर्नर व एल आकारात गंगापूर नाक्यापर्यंतचा रस्ता मॉडेल रस्ता म्हणून विकसित केला जाणार आहे. त्यासाठी अंदाजपत्रकामध्ये २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, दोन कोटी रुपये पहिल्या टप्प्यात खर्च केले जाणार आहे.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

त्याचबरोबर सर्वाधिक खर्च सिडको विभागातील गरवारे पॉइंट ते एक्स्लो पॉइंट व पुढे पपया नर्सरीपर्यंतच्या रस्त्यावर केला जाणार आहे. औद्योगिक क्षेत्रातून हा रस्ता जातो. अनेक वर्षांपासून रस्ता तयार करण्याची मागणी होती. अवजड वाहनांमुळे रस्ता खचला, त्याचबरोबर एमएनजीएल व अन्य कामांसाठी वांरवार रस्ता खोदण्यात आल्याने दुरवस्था झाली. त्यामुळे हा रस्ता विकसित केला जाणार आहे.

पेठ रोडवर सात कोटींचा खर्च

पेठ रोडवरील महापालिकेच्या हद्दीपर्यंत स्टेडीअमचे काम सुरू असल्याने त्यासाठी डोंगर खोदण्याचे काम सुरू आहे. डोंगर खोदाईची माती ट्रकमधून वाहिली जात असल्याने तसेच गुजरात भागातून मोठ्या प्रमाणात मालवाहतूक ट्रक येत असल्याने तवली फाट्यापर्यंतचा जवळपास चार किलोमीटरचा रस्ता खराब झाला आहे. रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलन झाले.

स्मार्टसिटी कंपनीच्या निधीतून रस्ता दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला, परंतु स्मार्टसिटी कंपनीने निधी वर्ग करण्यास नकार दिला. आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी रस्त्याचा मुद्दा विधानसभेत मांडला. महापालिकेने रस्ता दुरुस्तीसाठी जवळपास दोन कोटी रुपये खर्चाची निविदा काढली.

रस्ता दुरुस्तीसाठी ७१ कोटी रुपयांचा खर्च येणार असून, यंदाच्या अंदाजपत्रकामध्ये सात कोटी रुपये नव्याने तरतूद करण्यात आली आहे. पुढील आर्थिक वर्षात पश्चिम विभागात १५ कोटी रुपये, पूर्व विभागात ४१ कोटी, पंचवटी विभागात ४४, नाशिकरोड विभागात सोळा, सिडको विभागात २७, तर सातपूर विभागात बारा कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सह्याद्रीचा माथा : नाशिकचा चक्रव्यूह कोण, कसा भेदणार? 

सोलापूरमध्ये रमेश कदमांची भूमिका ठरणार निर्णायक? २८ एप्रिलच्या मेळाव्याकडे जिल्ह्याचं लक्ष

US Green Card : देश सोडून भारतीय बाहेर का जात आहेत?

Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य - धागा श्रद्धेचा जपावा लागणार!

दृष्टिकोन : राजेशाही, हुकूमशाही अन् लोकशाही

SCROLL FOR NEXT