Crime News esakal
नाशिक

Sakal Exclusive : वन्यजीव अवयव विक्रीचे नाशिक बनले केंद्र; 8 महिन्यात 6 घटना

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मागील काही महिन्यापासून जंगलात शिरून वन्यजीवांची शिकार करत त्यांच्या अवयवांचा तस्करी करण्याच्या अनेक घटना समोर आल्या घडल्या आहेत. मागील आठ महिन्यात झालेल्या आठ कारवाईमध्ये नाशिक जिल्हा हेच मध्यवर्ती ठिकाण तस्करीसाठी निवडण्यात आल्याने नाशिक जिल्हा हा वन्यजीव अवयव विक्रीचे नवे केंद्र बनले आहे.

वनक्षेत्रातील वन्यजीवांसह बिबट्याची शिकार करून त्याची कातडी व इतर अवयव विकण्यासाठी ‘स्लीपर सेल’ कार्यरत असल्याने हे रॅकेट करणाऱ्या टोळ्या व त्यांचे स्लीपर सेल जेरबंद करण्याचे मोठे आव्हान वनविभागापुढे उभे आहे. (Sakal Exclusive Nashik becomes hub for selling wildlife organs 6 incidents in 8 months Nashik Latest Marathi News)

नाशिक जिल्हा पश्चिम व वायव्य दिशेला गुजरातच्या नवसारी, वलसाड व डांग या जिल्ह्यांपर्यंत विस्तारला आहे. नाशिकचा सीमावर्ती भागात असलेल्या ठाणे, नगर, पालघर या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आढळून येते. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात वन्यजीवांच्या वास्तव आहे.

यासह गोदावरी, दारणा नदी काठी सुपीक जमीन असल्याने ऊसशेती मोठ्या प्रमाणात केली जात असल्याने आणि याठिकाणी कुत्रे, कोंबड्या, बकरी आदींसह पाळीव जनावरे मुबलक प्रमाणात असल्याने जिल्ह्यात बिबट्यांच्या संख्या शेकडोच्या घरात पोहचली आहे.

त्यामुळे थेट जंगलात शिरून बिबट्यांची शिकार करत त्यांच्या अवयवांची विक्री करत पैसे कमविण्याचा नवा उद्योग सुरु झाला आहे. यासाठी त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, जव्हार, मोखाडा, शहापूर येथील आदिवासी पाडे, वस्त्या आदी ठिकाणांवरील स्थानिक रहिवाशांचा समावेश आहे.

शहरात वनविभागाने टाकलेल्या धाडींमध्ये शहरातून वन्यजीवांची विक्री करणाऱ्या प्रतिष्ठीत व्यावसायिक आणि तस्कर यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईमुळे तस्करीचे हे लोण आता शहरापर्यंत देखील पोहचले आहे.

जिल्ह्यात झालेल्या कारवाया

२ फेब्रुवारी २०२२ रोजी सिन्नर-घोटी मार्गावर कारवाईत बिबट कातडी हस्तगत केली. त्यानंतर या घटनेत अटक करण्यात आलेल्या तस्कर यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पथकाने ४ फेब्रुवारी आणि ७ फेब्रुवारी रोजी मुरबाड आणि कसारा येथून पुन्हा बिबट्याची कातडी जप्त केली. त्यानंतर २४ मार्च रोजी नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरातून बिबट्याच्या कातडी महामार्गालगत आढळून आली.

त्यानंतर तीन महिन्यांनी ४ जुलै रोजी शहरातील प्रतिष्ठीत किराणा व्यावसायिक यांच्या दुकानावर वनविभागाने छापा टाकत मयत वन्यजीवांच्या अवयवांची विक्री होत असल्याने छापा टाकत अनेक अवयव जप्त केले होते. यानंतर ५ सप्टेंबर रोजी अंबाला घाटात वनविभाग आणि तस्कर यांच्यात झालेल्या झटापटीनंतर तस्कर यांना अटक करून त्यांच्याकडून बिबट कातडी त्याचे अवयव आणि दुर्मिळ गिधाडाचे अवयव मिळून आले.

यानंतर १५ सप्टेंबर रोजी आंबेगाव फाट्यावर करण्यात आलेल्या कारवाईत पाच महिन्याच्या बिबट्याची शिकार करत कातडी विक्रीचा डाव वनविभागाने उधळत कातडी जप्त केली. यानंतर २० सप्टेंबर रोजी शहरातील सायकल सर्कल येथून बिबट्याची कातडी विक्री करणाऱ्या तिघा संशयित यांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: चीन अन् रशियाकडून अणुचाचण्या सुरु असल्याचा ट्रम्प यांचा दावा; पाकिस्तानचंही घेतलं नाव, चीनकडून प्रत्युत्तर

Jaipur Accident: भीषण अपघात! डंपरची ४० वाहनांना धडक; ५० जणांना चिरडलं, ११ लोकांचा जागीच मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Dev Deepawali 2025 Travel Tips : देव दिवाळीला वाराणसीला जाऊ शकत नाही? मग भेट द्या 'या' अद्भुत ठिकाणांना

Mumbai Metro: भुयारी मेट्रोला उदंड प्रतिसाद! महिनाभरात ३८ लाख मुंबईकरांचा प्रवास

Nashik Cctv Network : सिंहस्थ अवघ्या दीड वर्षांवर; पण नाशिकचा 'तिसरा डोळा' बंदच! १० वर्षांनंतरही सीसीटीव्हीचे जाळे अपूर्ण

SCROLL FOR NEXT