rajya sabha election result sanjay raut  sanjay raut
नाशिक

आम्ही लालकिल्ल्याला नव्हे तर रायगडाला सलाम करतो; राऊतांची 'शिव'गर्जना

महाराष्ट्र पेटत नाही, पेटला तर विझत नाही, असा इशाराही संजय राऊतांनी दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेतल्या अभूतपूर्व बंडानंतर आता संजय राऊत, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निष्ठा यात्रेला सुरूवात झाली असून संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं असून आक्रमक शैलीत एकनाथ शिंदे आणि गटावर टीका केली आहे. (Sanjay Raut News)

या सभेदरम्यान नाशकात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातल्या आमदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या बंडाबद्दल बोलताना राऊत म्हणाले की, महाराष्ट्र एकतर पेटत नाही आणि पेटला तर विझत नाही. भाजपाने शिवसेना संपवण्याचे सगळे प्रयत्न केले. ते जेव्हा जमलं नाही तेव्हा त्यांनी कोट्यवधी रुपये खर्च केले, सगळ्या यंत्रणा कामाला लावल्या, दबाव, झुंडशाही वापरली, शिवसेना फोडली नव्हे तर शिवसेनेचे आमदार फोडले. या लोकांनी पुन्हा एकदा निवडून येऊन दाखवावं.

मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावरुनही त्यांनी टीका केली आहे. राऊत म्हणाले की, आपले मुख्यमंत्री आता दिल्लीत गेलेत, त्यांचं हायकमांड तिकडे आहे. पण आमचं शिवसेनेचं हायकमांड मुंबईत आहे. आमची माती, आमची माणसं. आम्ही लालकिल्ल्याला नव्हे तर रायगडाला सलाम करतो. मुख्यमंत्री स्वतःला शिवसेैनिक म्हणवतात पण गेले दिल्लीला. पण शिवसेनेचं हायकमांड मातोश्री आहे, महाराष्ट्राचं हायकमांड मातोश्री आहे. आमची दिल्लीशी लढाई आहे, आम्ही दिल्लीशी लढत राहू.

मरण पत्करेन पण शरण जाणार नाही

मी कधीही शिवसेनेशी गद्दारी करणार नाही, असं सांगत संजय राऊतांनी शिंदे गटाला चांगलंच सुनावलं आहे. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांचं करिअर संपणार, असं त्यांनी सांगितलं आहे. तर मरण पत्करेन पण शरण जाणार नाही, अशी घोषणाही त्यांनी दिली आहे.

शिवसेना आमच्याच बापाची!

शिवसेना आमचीच. शिवसेना जन्माला कोणी घातली? बाळासाहेब ठाकरेंनी घातली. तो आमचा बाप आहे. त्यामुळे शिवसेना आमच्याच बापाची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: तुझ्याशी बोलायचंय, काम झाल्यावर भेट...; विवाहित प्रियकरानं महिलेला बोलवलं, भयंकर कट रचून संपवलं, कारण काय?

Latest Marathi News Live Update : भाजपच्या मंचावरुन अजित पवारांच्या नेत्यांवर निशाणा

सुभेदारांचा जावई येतोय... 'ठरलं तर मग' मध्ये होणार अस्मिताच्या नवऱ्याची एण्ट्री; कोण आहे हा अभिनेता जो साक्षीसोबत करतोय फ्लर्ट?

Weekly Horoscope Prediction 2025: 'या' आठवड्यात कर्कसह 2 राशींवर राहील धनलाभाचा वर्षाव, नोकरीत मिळेल प्रमोशन!

'तू वॅक्स केलय?' संजय दत्तसोबतच्या बेडरुम सीनवेळी सोनाली कुलकर्णींला हेअर स्टायलिस्टने विचारलेला विचित्र प्रश्न

SCROLL FOR NEXT