Nashik Smart City latest marathi news
Nashik Smart City latest marathi news esakal
नाशिक

‘सप्तरंगी नाशिक’ देशातील पहिला कॉरिडोअर

नरेश हाळणोर

नाशिक : देशभरतील कोणत्याही शहरातील सर्वात गंभीर आणि तितकीच कटकटीची समस्या म्हणजे वाहतूक कोंडी, वाहन पार्किंग. या समस्येतून नाशिक शहरही सुटलेले नाही.

मात्र, नाशिकसारखे सुसज्ज रस्ते अन्‌ समृद्ध भौगिलिक रचना असलेल्या शहराला व्हिजीबिलिटी सीटी करण्याच्या दृिष्टकोनातून नाशिक शहराचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे (Police Commissioner Jayant Naiknavare) आणि स्मार्ट सिटी (Smart City) कंपनीने पहिले पाऊल ‘सप्तरंगी नाशिक’च्या दिशेने टाकले आहे.

‘सप्तरंगी नाशिक’चा प्रोजेक्ट नियोजनबद्ध आराखड्यानुसार अंमलात आल्यास देशभरातील हा पहिला कॉरिडोअर म्हणून नावलौकिक प्राप्त करणारा ठरेल. अगदी दर १२ वर्षांची होणारे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर तर गर्दींचे नियोजन करण्यासाठी ‘सप्तरंगी नाशिक’ अत्यंत उपयुक्त ठरू शकणार आहे. (Saptarangi Nashik is first corridor in county nashik Latest Marathi news)

नाशिक शहरातील रस्ते प्रशस्त आहेत. मुंबई-पुण्यासारखी प्रचंड वाहतूक कोंडीची समस्या नाशिकमध्ये नाही. त्यामुळे आत्तापासूनच भविष्य उद्‌भवू शकणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येचा आत्ताच निपटारा करण्यासह, नाशिकमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला शहरात प्रवास करणे अधिक सुलभ जाण्यासाठी ‘सप्तरंगी नाशिक’ कॉरिडोअरची संकल्पना पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी तयार केली आहे.

स्मार्ट सिटीसाठी ‘सप्तरंगी नाशिक’ची संकल्पना आयुक्तांनी मांडली असता, स्मार्ट सिटी कंपनी आणि महापालिक आयुक्त रमेश पवार यांनी या संकल्पनेला पाठबळ देण्यासाठी सकारात्मक पाऊलं टाकायला सुरुवात केली आहे.

अशी आहे ‘सप्तरंगी नाशिक’ची संकल्पना

नाशिक शहराचा मध्यवर्ती केंद्रबिंदू म्हणून सीबीएस चौक हा ० किमी. (झिरो माईल्स) ठरावा. या मध्यवर्ती सीबीएस चौकाकडे येणारे रस्ते हे ‘अप’ तर, सीबीएस चौकाकडून बाहेर पडणारे रस्ते ‘डाऊन’ समजावे. या झिरो माईल्सपासून प्रत्येक १०० मीटरवर गुगल मॅपिंग करण्यात यावे.

हे साधारण १० ते २० कि.मी.पर्यंत करून त्याची कनेक्टिव्हिटी गुगल मॅपिंगशी जोडून त्याच्याशी नाशिक वाहतूक पोलीस शाखा व पोलीस नियंत्रक कक्षाशी जोडला जावा. शहरात विविध दिशेने मार्गस्थ होणाऱ्या सात रस्त्यांना विविध रंगांची नावे द्यावीत.

उदा. त्र्यंबकेश्‍वरकडे जाणाऱ्या रस्त्याला भगवा रंग, दिंडोरीकडे जाणाऱ्या रस्त्याला निळा अशास्वरुपाने प्रत्येक रस्त्याला विशिष्ठ रंगाची नावे देत त्या रस्त्यावर त्या रंगाचीच प्रत्येक १०० मीटरवर पाईंटिंग करावी. नाशिकमध्ये पंचवटीत आलेला एखादा भाविकाला पंचवटीतून त्र्यंबकला जायचे असेल तर, तो त्या रस्त्यासाठी असलेल्या रंगाच्याच दिशेने आपले वाहन नेऊ शकेल.

सिंहस्थ कुंभमेळ्यात गर्दीवर नियंत्रण सोपे

नाशिक धार्मिक पर्यटनासह सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे. कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. यामुळे ठिकठिकाणी गर्दी होते. या गर्दीतून मोठी दूर्घटनाही घडू शकते. ‘सप्तरंगी नाशिक’ कॉरिडोअर प्रत्यक्षात साकारले गेले तर, गुगल मॅपिंगमुळे शहरातील रस्त्यांवरील भाविकांच्या गर्दीची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला सहज मिळू शकेल.

त्यामुळे या गर्दीचे दूर्घटनेपूर्वीच नियोजन करणे पोलीस प्रशासनाला शक्य होईल. अथवा, एखादा इसम शहरात हरवला वा छेडछाडीची घटना घडत असेल. त्यासंदर्भातील ११२ क्रमांकावर संपर्क साधला गेल्यास तात्काळ गुगल मॅपिंग आणि सप्तरंगी नाशिक कॉरिडोअरमुळे पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदत करू शकतील.

"स्मार्ट सिटी म्हणजे सुसज्ज चकचकीत रस्ते, पथदीप असे न होता आयडीएल शहराची निर्मिती करण्यासाठी व्हिजीबल सिटी होणे आवश्‍यक आहे. त्याचदृष्टिकोनातून सप्तरंगी नाशिक ही संकल्पना मांडली. त्यास स्मार्ट सिटी कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, त्या दृष्टिने महापालिक, स्मार्ट सिटी आणि शहर पोलीस प्रत्यक्षात साकार करणार आहोत."

- जयंत नाईकनवरे, पोलीस आयुक्त, नाशिक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ''...त्या बैठकीला मी हजर होतो, मनमोहन सिंहांना मी विरोध केला होता'', मोदी नेमकं काय म्हणाले?

Rishabh Pant Vs Sanju Samson : टी 20 वर्ल्डकपसाठी ऋषभ पंत की संजू सॅमसन कोण आहे टीम इंडियाची पहिली पसंती?

'बजरंगी भाईजान' मधील मुन्नीने केली ट्रोलर्सची बोलती बंद ; दहावीला मिळाले इतके गुण

Modi Rally in Kalyan: पहिल्या 100 दिवसांच्या व्हिजनमध्ये 25 दिवस वाढवणार; मोदींनी केलं तरुणांना आवाहन

CAA Certificates: केंद्राकडून CAAची प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात; कोणाला मिळालं पहिलं प्रमाणपत्र? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT