Sports  sakal
नाशिक

Sports Scholarship : क्रीडापटूंना नाशिक महापालिकेची शिष्यवृत्ती; असे असेल वितरण

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेकडून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरावर क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शिष्यवृत्ती दिली जाणार असून, त्याअनुषंगाने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेकडून मागील चार वर्षात ७६ खेळाडूंना अर्थसाहाय्य दिले आहे.

तीन प्रकारात क्रीडा शिष्यवृत्ती किंवा अर्थसाहाय्य दिले जाते.

आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात प्रथम आलेल्या खेळाडूला एक लाख रुपये, द्वितीय क्रीडापटूला ७५ हजार, तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या खेळाडूला ५० हजार रुपये दिले जातात. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर पहिला क्रमांक मिळविलेल्या खेळाडूला २५ हजार रुपये, दुसऱ्याला १५ हजार रुपये, तर तिसऱ्या खेळाडूला दहा हजार रुपये दिले जाते.

राज्यस्तरावर कामगिरी केलेल्या पहिल्या क्रमांक मिळवलेल्या खेळाडूला सात हजार रुपये, दुसऱ्या खेळाडूला पाच हजार, तर तिसऱ्याला तीन हजार रुपये क्रीडा शिष्यवृत्ती दिली जाते. महापालिका समाजकल्याण विभागाकडे पात्र खेळाडूंना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेने आंतरराष्ट्रीय क्रीडापटूंना पावणेदोन लाख, तर राष्ट्रीय क्रीडापटूंना आतापर्यंत चार लाख ४५ हजार अर्थसाहाय्य अदा केले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन, तर राष्ट्रीय स्तरावर २५ खेळाडू निवडण्यात आले. राज्यस्तरीय ४९ खेळाडूंना दोन लाख ६१ हजार रुपयांचे रक्कम देण्यात आली. एकूण ७६ खेळाडूंना आठ लाख ८१ हजार रुपये क्रीडा शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Clouds Arabian Sea : मॉन्सूनची चाहूल! गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीवर मोठे ढग तयार; मुंबईसह उपनगरांत पावसाला सुरूवात

मंदार चांदवडकर नाही तर तारक मेहतामधील भिडे गुरुजीच्या भूमिकेसाठी 'या' मराठी अभिनेत्याला मिळाली ऑफर !

आनंदवार्ता! वाघ संवर्धनाला नवी चालना; ताडोबातील 'झिनत' ने ओडिशात दिला चार शावकांना जन्म

Stock Market Today: अमेरिका-इराण तणावामुळे शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 700 अंकांनी घसरला, कोणते शेअर्स वाढले?

Petrol-Diesel Price: कच्च्या तेलात भावात 7% वाढ झाल्यानंतर देशात पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू! पाहा तुमच्या जिल्ह्यातील ताजे दर

SCROLL FOR NEXT