School Admissions
School Admissions esakal
नाशिक

विद्यार्थी मिळण्यासाठी रस्सीखेच; पालकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

प्रभाकर बच्छाव

येसगाव (जि. नाशिक) : १३ जूनपासून प्राथमिक शाळा (Primary Schools) उघडत आहेत. तसेच, शहरी व ग्रामीण भागातील इंग्रजी माध्यमांच्या शाळा उघडणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागातील विद्यार्थी मिळण्यासाठी गाव परिसरात इंग्रजी माध्यमांच्या (Convent Schools) स्कूल बस फिरू लागलेल्या आहेत. (schools Trying to attract parents for admissions Nashik News)

ग्रामीण भागात काही इंग्रजी वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे शाळांची संख्या वाढल्याने त्यांच्यात विद्यार्थी मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. नव्या शाळाचे आकर्षक बांधकाम, भौतिक सुविधा व शाळेतील मिळणाऱ्या सर्व शैक्षणिक सुविधांची माहिती शिक्षक, पालकांना देत आहेत. अनेक गावात अर्ज भरून दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थी शेतमळ्यात असला तरी त्याला शहरी भागात आणण्यासाठी स्कूल बसची सुविधा होऊ लागली आहे. नामांकित शाळेमध्ये प्रवेश मिळण्यासाठीची कसरत थांबली आहे. कोरोनापासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शहरी भागाकडे शिक्षणासाठी पाठ फिरवली आहे.

शैक्षणिक प्रवाहाच्या लाटेत ग्रामीण भागातील शाळांनी पाय घट्ट रोवले आहेत. ज्या पालकांची आर्थिक स्थिती व सोय मजबूत नाही त्यांचे पाल्य गावातील शाळेत जातात. प्रत्येक पालक जागरूक झाला आहे. गावातील शाळा व्यवस्थापन समिती शैक्षणिक विचारपूस करतात. मागील काही वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांनी वर्ग भरलेले दिसत नव्हते. पटसंख्येवर परिणाम झाला होता. मात्र, ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक व शिक्षकांच्या मदतीने शाळा भौतिक सुविधांनी सज्ज व डिजिटल झालेल्या आहेत. हसत- खेळत शिक्षण झाले. ज्ञानसंरचनावादी शिक्षण, बोलक्या भिंती, वर्गाबाहेरील भिंतीवर ऑईलपेंटची आकर्षक रंगीत चित्रे, बदलता पोषण आहार, पिण्याच्या पाण्याची सोय.

विविध प्रकारची परिसरात वृक्ष यामुळे रमनिय वातावरण, अनेक पाल्यांना शहरी भागात शिकविण्याची भुरळ कमी होऊ लागल्याने विद्यार्थ्यांचा शहरात जाण्याचा कल कमी झाला आहे. ग्रामीण भागातील शिक्षण लाभदायी ठरू लागले आहे. ग्रामीण भागातील अनेक मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पहिलीपासून इंग्रजी शिकण्याची सोय उपलब्ध झाली आहे. गावातील शाळांमधील शिक्षण लाभदायी ठरू लागले आहे.

"सहा ते सात वर्षांच्या दाखलपात्र विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या माता- पालक बैठका घेतल्या गेल्या. एप्रिलपासून आम्ही गाव व परिसरात विद्यार्थ्यांचा सर्वे केला आहे. विद्यार्थ्यांसाठी पहिल्या दिवसापासूनच मोफत गणवेश व पाठ्यपुस्तके, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, १०० टक्के पोषण आहार, बसण्यासाठी बाकड्यांची सोय आहे. त्यामुळे पालकांचा जिल्हा परिषद शाळेकडे कल वाढू लागला आहे."
- संजय वाघ, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, येसगाव खुर्द

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Labour Day : एक दंगल झाली आणि त्यामुळे जगात कामगार दिन साजरा होऊ लागला, वाचा इतिहास

Maharashtra Din 2024 : बहु असोत सुंदर संपन्न की महा..प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा.! महाराष्ट्र दिनाच्या द्या हटके शुभेच्छा

ढिंग टांग : भटकती आत्मा आणि बाबा बंगाली..!

Labour Day : गरजूंना हमखास रोजगार मिळवून देणारी ही सरकारी योजना तुम्हाला माहीत आहे का ?

SCROLL FOR NEXT